वसाकाच्या पहिल्या पोत्यांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:00 AM2018-11-23T01:00:39+5:302018-11-23T01:04:09+5:30

लोहोणेर : धाराशिव कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाच्या पहिल्या पाच साखर पोत्याचे पूजन चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. कर्जाच्या बोज्याखाली दबलेला वसाका धाराशिव कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला आहे.

Worshiping the first grandchildren | वसाकाच्या पहिल्या पोत्यांचे पूजन

वसाकाच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन करतांना चेअरमन अभिजित पाटील. समवेत संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जाच्या बोज्याखाली दबलेला वसाका धाराशिव कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला आहे.

लोहोणेर : धाराशिव कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाच्या पहिल्या पाच साखर पोत्याचे पूजन चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. कर्जाच्या बोज्याखाली दबलेला वसाका धाराशिव कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला आहे.
मध्यंतरी वसाका तांत्रिक अडचणीमुळे पाच दिवस बंद होता मात्र त्यावर मात करून अखेर दोन दिवसापूर्वी वसाका सुरळीत चालू करण्यात आल.गाळप झालेल्या वसाकाच्या पहिल्या पाच साखर पोत्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक अमर पाटील, साळुंके, चौघुले, भोसले, कांबळे, संजय पाटील ,मनोहर जावळे, खारे, धनगर, नितीन शिंदे, नितीन सरडे, आदींसह सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन मनोहर जावळे यांनी केल. कुबेर जाधव यांनी आभार
मानले.वसाका सुरळीत चालू झाला असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस वसाकास देऊन सहकार्य करावे.आमचा सुमारे पाच लाख टनांचे गाळप करण्याचा मानस असून त्यासाठी ऊस उत्पादक, शेतकरी व कामगार यांनी सहकार्य करावे.
- अभिजित पाटील, चेअरमन

Web Title: Worshiping the first grandchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.