शिरसाठेत गाळ उपसण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:46 PM2019-05-18T18:46:32+5:302019-05-18T18:47:11+5:30

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. यावर मात करण्यासाठी सॅमसोनाइट कंपनीने पुढाकार घेतला आहे.

The work of pouring down the sludge is going on | शिरसाठेत गाळ उपसण्याचे काम सुरू

शिरसाठे येथे उत्तरदायित्व निधीतून गाळ उपसा कामाचे उद्घाटन करताना यशवंत सिंह, गोरख बोडके, मिलिंद वैद्य आदींसह ग्रामस्थ.

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध भागात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. यावर मात करण्यासाठी सॅमसोनाइट कंपनीने पुढाकार घेतला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोडाळे येथे ट्रान्स्फार्मर आणि शिरसाठे येथे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
उत्तरदायित्व निधीतून कंपन्यांनी तालुक्यात पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाई निर्मूलनासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केले होते. त्यांना प्रतिसाद देत गोंदे दुमाला येथील सॅमसोनाइट कंपनीने शिरसाठे सप्रेवाडी धरणात आठ लाख लिटर पाणी साठा होणाऱ्या कामाचा शुभारंभ केला. मोडाळे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर देण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कंपनीचे अधिकारी यशवंत सिंह, मिलिंद वैद्य, सुयोग जोशी उपस्थित होते.

Web Title: The work of pouring down the sludge is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.