महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:02 PM2019-07-10T14:02:31+5:302019-07-10T14:03:02+5:30

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले.

Women work hard in different fields Alka Kubal | महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल

विंचूर येथे महिलांशी हितगुज करताना अलका कुबल. समवेत रूपचंद भागवत, वेदिका होळकर आदी. 

Next
ठळक मुद्देअलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक


विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले. अलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी येवला पंचायतसमितीचे उपसभापती तथा नारायण गिरी महाराज फाऊंडेशनचे संचालक रूपचंद भागवत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नयना उगले,सुमन शेलार,खेडलेझुंगे च्या सरपंच सुषमा गिते, विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर, वेदीका होळकर, सुनील कासुर्डे हे होते. कुबल यावेळीम्हणाल्या छोट्या गोष्टींंमध्ये समाधान मानावे. एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगिकार करावा.ज्यायोगे भावी पिढी सुसंस्कृत होते. पुरु षांनी देखील पुरु षी मानिसकता बदलून मुलींना व महिलांना पाठबळ द्यावे.असे सांगितले.तर रु पचंद भागवत यांनी नारायण गिरी महाराज फाऊंडेशनच्या वतीने सुरू असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणात दिली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामिगरी केलेल्या पुरस्कार्थी महिला सौ.ज्योती देशमुख विद्या नेवरे श्रद्धा कासुर्डे सुषमा गीते सुमित्रा बुटे कुसुम सुराशे वर्षा कदम मनीषा सोनवणे निशा भंडारे वसुंधरा वाकचौरे सत्कारार्थी सिंधुबाई शकुंतला जाधव दिपाली परळीकर , रेखा सानप यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान उपस्थित महिलांमधून सोडत पद्धतीने शीतल सोमनाथ महाले, अर्चना कैलास घुमरे, आरती सचिन जाधव या तीन भाग्यवान महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी भागवत सोनवणेयांनी मनोगत केले.सुनील गायकवाड, सर्जेराव सावंत, बाळासाहेब कोटकर, रतन बोरणारे,नवनाथ घोडके,कृष्णा खोजे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद उगले यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ भालेराव ,न्यानेश्वर भागवत यांनी केले.
 

Web Title: Women work hard in different fields Alka Kubal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.