सिडको भागात रात्रीपर्यंत बॅँकेचा दरवाजा उघडा राहतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:25 AM2019-06-29T00:25:55+5:302019-06-29T00:26:13+5:30

मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडेखोरांकडून सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना ताजी असतानाच सिडको परिसरातील कामटवाडे येथील ठाणे जनता सहकारी बॅँकेचा पाठीमागील दरवाजा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सताड उघडाच होता. बॅँकेच्या एटीएमजवळ रात्री काही तरी हालचाल झाल्याने उघड्या दरवाजाजवळील सायरन वाजले.

 When the bank door remains open in the CIDCO area ... | सिडको भागात रात्रीपर्यंत बॅँकेचा दरवाजा उघडा राहतो तेव्हा...

सिडको भागात रात्रीपर्यंत बॅँकेचा दरवाजा उघडा राहतो तेव्हा...

Next

नाशिक : मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडेखोरांकडून सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना ताजी असतानाच सिडको परिसरातील कामटवाडे येथील ठाणे जनता सहकारी बॅँकेचा पाठीमागील दरवाजा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सताड उघडाच होता. बॅँकेच्या एटीएमजवळ रात्री काही तरी हालचाल झाल्याने उघड्या दरवाजाजवळील सायरन वाजले. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना माहिती दिली. अवघ्या काही वेळेतच घटनास्थळी पोलिसांची कुमक सशस्त्र दाखल झाली. तत्काळ बॅँकेच्या परिसरात घेराबंदी करण्यात आली.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी फायनान्स कंपन्यांसह बॅँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी सुरक्षेविषयी चर्चा करत खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या. सुरक्षेमध्ये कसूर राहणार नाही, याबाबत दक्ष राहण्यास नांगरे-पाटील यांनी सांगितले; मात्र बैठकीला आठवडा उलटत नाही तोच एका बॅँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा निष्काळजीपणाचा कळस समोर आला. सुदैवाने चोरट्यांची नजर बॅँकेच्या उघड्या दरवाजावर पडली नाही, अन्यथा लाखो रुपयांची लुटीचा धोका होता, असे पोलिसांनी सांगितले. ठाणे जनता बॅँकेच्या कामटवाडे शाखेचा पाठीमागील बाजूस असलेला लाकडी दरवाजा व त्याभोवती असलेली लोखंडी ग्रील रात्री साडेआठ वाजेपर्यंत उघडी होती. सुदैवाने सायरन वाजला आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. उपआयुक्त अमोल तांबे यांनी बॅँकेच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले असता दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून दरवाजा रात्रीच्या ८.३० वाजेपर्यंत उघडाच असल्याचे आढळले.
‘अ‍ॅलर्ट कॉल’होताच पोलीस सज्ज
या घटनेने शहर पोलिसांना चांगलेच हादरवले. उपआयुक्त अमोल तांबे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत सतर्क केले. त्यानंतर नियंत्रण कक्षावरून सतर्क ‘कॉल’ होताच शहर पोलीस सज्ज झाले. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तत्काळ शहर व परिसरात नाकाबंदीसह गस्त पथकांना सूचना दिल्या. शहराच्या सीमा नाक्यांनाही सतर्क करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे घटनास्थळी पोहचले. आयुक्तालयातूनही सशस्त्र जवान दाखल होत ‘पोझिशन’ घेतली. परोपकारी यांनी बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. व्यवस्थापक आल्यानंतर परोपकारी त्यांच्यासोबत आतमध्ये गेले असता बॅँकेत दरोडेखोर, चोरटे नसल्याची खात्री पटली.

Web Title:  When the bank door remains open in the CIDCO area ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.