पाण्याच्या टाक्या  तीन महिन्यांत फुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:21 AM2018-04-25T00:21:13+5:302018-04-25T00:21:13+5:30

येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ट बांधकामाबाबत सदैव चर्चेत असताना, आता रुग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ट नमुना समोर आला आहे.

Water tanks split in three months | पाण्याच्या टाक्या  तीन महिन्यांत फुटल्या

पाण्याच्या टाक्या  तीन महिन्यांत फुटल्या

Next

पेठ : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ट बांधकामाबाबत सदैव चर्चेत असताना, आता रुग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ट नमुना समोर आला आहे.  पेठ हा आदिवासीबहुल तालुका असल्याने येथील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बलसाड रोडवर सुसज्ज अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले; मात्र सदरचे बांधकाम करत असताना त्याच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले.अंदाजपत्रकानुसार काम न करणे, निकृष्ट दर्जाच्या वाळूचा वापर, अपूर्ण बांधकाम, रॅम्प सुविधा अपूर्ण, पावसाचे पाणी सरळ इमारतीत घुसणे अशा अनेक समस्या असताना, संबंधित विभाग व ठेकेदारांनी सदर इमारत घाईगर्दीत रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग केली; मात्र तीन महिन्यांच्या कालावधीतच या इमारतीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या फुटून त्यांचे तुकडे झाले. यामुळे उन्हाळ्यात पाण्यावाचून गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Water tanks split in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.