त्र्यंबकेश्वरला दर्शन बारीसाठी वॉटर प्रूफ शामियाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:46 PM2018-08-04T14:46:49+5:302018-08-04T14:47:47+5:30

 Water proof aam aadmi to Trimbakeshwar Darshan | त्र्यंबकेश्वरला दर्शन बारीसाठी वॉटर प्रूफ शामियाना

त्र्यंबकेश्वरला दर्शन बारीसाठी वॉटर प्रूफ शामियाना

Next

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनसाठीच्या बारीसाठी भव्य वॉटर प्रूफ शामियाना उभारण्यात आला असून श्रावण महिन्यापुर्वीच त्याचा वापर सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्व दरवाजाने सोडले जाते. तथापि आतापर्यंत पुर्वगेटच्या शामियान्याचे काम पुर्ण झाले नव्हते. त्यामुळे भाविकांना उत्तर गेटने प्रवेश दिला जात होता. पावसामुळे भाविकांची अतिशय गैरसोय होत होती. त्र्यंबकमध्ये पावसाचा मुक्काम आता वाढला आहे आणि दर्शनार्थी भाविकांची संख्या देखील वाढलेली आहे. मंदिर ट्रस्टने आतापर्यंत पुर्व गेट दर्शन बारी मंडप उभारलेला नव्हता. आता मंडपाचे काम पुर्ण झाले आहे. हा शामियाना तथा मंडप संपुर्ण वॉटरप्रुफ असुन ५० ते ६० मीटर मापाचा तयार करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टने पुर्वगेटने सद्य स्थितीला भाविकांना उत्तर दरवाजाने प्रवेश दिला जात आहे. मात्र भाविक भर पावसात उभे असतात. यामध्ये लहान मुले आणि वयोवृध्दांचा देखील मोठा भरणा असतो. मंदिर ट्रस्टवर नव्याने विश्वस्त नियुक्त झाले आहेत. नियुक्ती दरम्यान झालेल्या मुलखतीत जवळपास प्रत्येक अर्जदाराने भाविकांच्या दर्शनबारीची सुविधा निर्माण करणार असे सांगीतले होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने येथे २०० रु पयात थेट दर्शन सुविधा काही वर्षांपासून उपलब्ध करु न दिली आहे. दोनशे रु पये देणगी पावती घेऊन उत्तर दरवाजाने थेट दर्शनबारीत सोडले जाते.
-----------------------------
दर्शन बारी मंडपाचे काम पुर्ण झाले असुन या मंडपात एका वेळेस हजारो भाविक उभे राहु शकतात. दर्शन बारीत आपला नंबर येईपर्यंत दर्शनाथीच्या सोयीसाठी मोठा टीव्ही संच बसविण्यात आला आहे. वृध्द, महिला पुरु ष यांना रांगेतच बसण्यासाठी बाकडे, बाजुला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच फ्रेश होण्यासाठी महिला व पुरु षांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, देवस्थानचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.याप्रमाणे मंडप सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली आहे. हा शामियाना दोन महिन्यापुरता आहे. मंडप अत्यंत आकर्षक व भक्कम उभारण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या व एरवी होणा-या संपुर्ण व्यवस्थेवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बोधनकर, सचिव डॉ.चेतना मानुरे केरुरे, विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, संतोष दिघे व सौ.तृप्ती धारणे आदी लक्ष ठेउन आहेत.

Web Title:  Water proof aam aadmi to Trimbakeshwar Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक