मनपाच्या विधी, शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:58 PM2017-09-28T14:58:26+5:302017-09-28T14:58:38+5:30

Waiting for the proposals of Municipal Corporation, City Improvement Committee | मनपाच्या विधी, शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

मनपाच्या विधी, शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

Next


नाशिक - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.
सत्ताधारी भाजपाने आपल्या जास्तीत जास्त सदस्यांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्या नव्याने गठित करण्यात आल्या. आरोग्य समितीच्या सभापतीपदाची धुरा सतिश कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापतीपदी भगवान दोंदे तर विधी समिती सभापतीपदी शीतल माळोदे सांभाळत आहेत. महासभेने या समित्यांना १० लाखापर्यंत खर्चाचे अधिकार दिले असले तरी नगरसचिव विभागाने त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये या तिनही समित्यांच्या पहिली बैठक घेण्यात आली. त्यात, विधी समितीची सभा २२ आॅगस्टला तर शहर सुधार समितीची ८ आॅगस्टला सभा झाली. परंतु, त्यानंतर समितीपुढे एकही प्रस्ताव प्रशासनाकडून प्राप्त न झाल्याने दुसºया सभेला मुहूर्तच लाभू शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही सभापती केवळ कक्षापुरतेच मर्यादित ठरले आहेत. आरोग्य समितीचे सभापती सतिश कुलकर्णी यांनी मात्र सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतल्याने समितीच्या आतापर्यंत तीन सभा पार पडल्या आहेत शिवाय, समितीच्या सदस्यांनी रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी दौरेही केले आहेत. विधी व शहर सुधार समितीला मात्र अद्याप प्रशासनाने ताकास तूर लागू दिलेला नाही. विषय कोणते द्यायचे, याच गोंधळात प्रशासन अडकले आहेत. त्यामुळे समितीचे सभापतीही आपल्या कार्यकक्षांबाबत संभ्रमित आहेत.

Web Title: Waiting for the proposals of Municipal Corporation, City Improvement Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.