बाजार समित्यांच्या मतदार यादीचा मार्ग मोकळा सामूहिक खातेदार होणार मतदार : शुक्रवारी यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:41 AM2018-01-31T01:41:12+5:302018-01-31T01:42:03+5:30

नाशिक : नाशिकसह राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर मंगळवारी अखेर सहकार आयुक्तांनी तोडगा काढत नोंदणी करण्याची मुभा दिल्यामुळे सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Voters in the voters list will be freed by collective account holders of market committees: | बाजार समित्यांच्या मतदार यादीचा मार्ग मोकळा सामूहिक खातेदार होणार मतदार : शुक्रवारी यादी प्रसिद्ध

बाजार समित्यांच्या मतदार यादीचा मार्ग मोकळा सामूहिक खातेदार होणार मतदार : शुक्रवारी यादी प्रसिद्ध

Next
ठळक मुद्देसहकार कायद्यात सुधारणामतदार यादी तयार करणे अपेक्षित

नाशिक : सहकार सुधारणा कायद्यान्वये होऊ घातलेल्या नाशिकसह राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर मंगळवारी अखेर सहकार आयुक्तांनी तोडगा काढत दहा गुंठ्यांपेक्षा अधिक जागा ताब्यात असलेल्या सामूहिक खातेदाराला मतदार म्हणून नोंदणी करण्याची मुभा दिल्यामुळे आता शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्णातील सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करून सहकार क्षेत्रातील निवडणुकीसाठी मतदारांची व्याख्याही बदलली आहे. तब्बल महिनाभर सहकार आयुक्तांकडून कोणताही खुलासा न झाल्याने मतदार यादी तयार करण्याचे काम ठप्प झाले होते. सहकार आयुक्तांनी दिलेल्या मुदतीनुसार ७ जानेवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करणे अपेक्षित होते. मतदार यादी तयार करताना येणाºया अडचणींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्याकडे बैठक घेण्यात आली. त्यात नाशिक, नांदेड, यवतमाळ, सोलापूर जिल्ह्णातील निवडणूक अधिकाºयांनी त्यांना येणाºया अडचणी मांडल्या. त्यावर चौधरी यांनी जमिनीचे जितके क्षेत्र असेल त्या क्षेत्राची खातेदारांमध्ये समसमान विभागणी करून दहा गुंठ्यापेक्षा जास्त जागा ज्याच्या नावे येईल, अशा सर्वांची मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या सूचना केल्या तसेच खातेदार अज्ञानी असेल तर त्याला घेऊ नये व खातेदार असेल परंतु बाजार समिती कार्यक्षेत्रात रहिवास नसेल तर अशांनाही मतदार करून घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्णातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली असून, सहकार विभागाकडून मतदार यादी तयार करण्याचे काम केले जात आहे. सहकार आयुक्तांनी यासंदर्भातील संभ्रम दूर केल्यामुळे आता येत्या शुक्रवारी प्रारूप यादी जाहीर होईल.
मार्गदर्शन मागविले
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात दहा गुंठ्यांहून अधिक शेतजमीन ताब्यात असलेल्या व्यक्तीला मतदार म्हणून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाºया नवीन कायद्यामुळे मतदार यादी तयार करताना संभ्रम निर्माण झाला होता. ग्रामीण भागात एक ते दहा एकरपर्यंत शेतजमीन नावावर असलेले अनेक शेतकरी असून, त्यांच्या सातबारा उताºयावर एकापेक्षा अनेकांची नावे आहेत. अशा वेळी नेमक्या कोणत्या शेतकºयाचे मतदार म्हणून नाव लावावे, असा प्रश्न मतदार यादी तयार करणाºया यंत्रणेला पडला होता. त्यासाठी सहकार आयुक्तांकडून मार्गदर्शनही मागविण्यात आले होते.

Web Title: Voters in the voters list will be freed by collective account holders of market committees:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.