टोळीने केली हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 07:43 PM2018-11-12T19:43:17+5:302018-11-12T19:46:03+5:30

जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून अन्य सात ते आठ शिकारी आपल्या दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत.

The victim of a hay | टोळीने केली हरणाची शिकार

टोळीने केली हरणाची शिकार

Next
ठळक मुद्देग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश

जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून अन्य सात ते आठ शिकारी आपल्या दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत.
गेल्या वर्षभरापासून मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर गुजरात राज्यातील काही मजूर कामावर असून, हे मजूर अहवा जि. डांग (गुजरात राज्य) येथील सहकाऱ्यांना या परिसरात रात्री बोलावून हरणांची शिकार करीत असल्याचा सुगावा येथील ग्रामस्थांना लागला होता. त्यामुळे ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवून होते.
दरम्यान काल (रविवारी) मध्यरात्री गुजरात पासिंगच्या काही मोटार सायकली संशयीतरित्या जंगलालगत उभ्या असल्याचे व रस्त्यालगच्या अवैध गावठी दारूच्या अड्यावर काही जण नशा करीत असल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तोपर्यंत ग्रामस्थांनी पाचही दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीत जमा केल्या. ग्रामस्थांनी व वनकर्मचा-यांनी दारू अड्ड्याचा मालक जिभाऊ आहिरे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांना तीन वर्षीय चिंकारा नर जातीच्या हरणाची शिकार केलेली आढळून आली. यावेळी येथे उपस्थित संशयितांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. नागरिकांनी पाठलाग करत तीन जणांना ताब्यात घेतले. आरोपी हत्यारबंद असतांनाही नागरिकांनी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी जिवाची पर्वा न करता तीन आरोपींना पकडले, मात्र अंधाराचा फायदा घेवून सात आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. तिन्ही आरोपीना नागरिकांनी चोप देत पाच दुचाकी, कोयता, हरण शिजविण्याचे साहित्यासह वनविभागाच्या स्वाधीन केले. या आधीही या टोळक्याने हरणांची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून जंगलात हरणांसह मोरांचा व जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. त्यातच दुष्काळाच्या झळा वन्यप्राण्यांना बसु लागल्याने पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. याचाच फायदा घेऊन शिकारी आपला कार्यभार साधत असल्याचे समोर आले आहे. याच परिसरात वीस ते पंचवीस हरणाच्या कळपाचा वावर असून, दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीही या भागात संशियतरित्या फिरणारी बोलेरेगाडी मध्यरात्रीच्या सुमारास अडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. यावेळी रस्त्यावर आडवी केलेल्या बैलगाडीला धडक देऊन संशयितांनी पळ काढला होता.
अटक केलेल्यांची नावे - जिभाऊ तुळशीराम आहिरे (६०) रा. अंबासन ता.बागलाण, शैलेश सोन्या बागुल (२२) रा. करंजटी ता. अहवा जि.डांग (गुजरात), तुळशीराम सखाराम पवार (३०) रा. करंजटी ता.अहवा जि.डांग (गुजरात) तर परवीश मंगा चौधरी, सुरेश मुरली वारळी, पिंट्या मगन वारळी, धर्मेश आडगू, शिवमन उमेश वारळी, ईश्वर गंगाराम गावित, अश्विन गंगाराम गावित सर्व राहणार कंरजटी ता. अहवा जि. डांग (गुजरात राज्य) हे अंधारात फरार झाले. वनविभागाने घटनास्थळाहून जीजे. ३० बी १७४४, जीजे १५ एके ४२३८, जीजे ३० बी ३००४, जीजे ३० सी २०१६, जीजे ३० बी ०२४२ या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
 

Web Title: The victim of a hay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल