‘संदीप देसिन्झ’मधून वास्तुरचनेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:41 AM2017-09-02T00:41:28+5:302017-09-02T00:41:47+5:30

संदीप विद्यापीठाच्या वतीने इंडियन फॅशन अकॅडमी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘संदीप देसिन्झ- २०१७’ या फॅशन शोमध्ये प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतातील बदलत्या वास्तुरचनेचे दर्शन घडविण्यात आले.

Vasturachane Darshan from 'Sandeep Desinze' | ‘संदीप देसिन्झ’मधून वास्तुरचनेचे दर्शन

‘संदीप देसिन्झ’मधून वास्तुरचनेचे दर्शन

Next

नाशिक : संदीप विद्यापीठाच्या वतीने इंडियन फॅशन अकॅडमी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘संदीप देसिन्झ- २०१७’ या फॅशन शोमध्ये प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतातील बदलत्या वास्तुरचनेचे दर्शन घडविण्यात आले.
विद्यापीठातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी फॅशन शोमध्ये आपले डिझाइन सादर केले. या कार्यक्रमाला डिझायनर सलीम असगरअली उपस्थित होते. या शोमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे आठ गट तयार करण्यात आले होते. त्यांनी भारतीय वास्तुरचनेवर आधारित कलेक्शन सादर केले. प्राचीन इतिहासाच्या या प्रवासात विविध कालखंड दर्शविणारे रंग, पोत, रचना आणि कापडाचे प्रकारही सादर करण्यात आले. बदलत्या भारतीय वास्तुरचना डिझाइन्सद्वारे सादर करून देशाचा इतिहास आणि आधुनिकता समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे आयएफएचे संस्थापक नितीन मगर यांनी सांगितले तर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा यांनी या फॅशन शोद्वारे पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

Web Title: Vasturachane Darshan from 'Sandeep Desinze'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.