टाकेद येथील शेतकऱ्याचा अनोखा उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:47 PM2019-05-28T18:47:20+5:302019-05-28T18:58:40+5:30

सर्वतीर्थ टाकेद : धरणांचा तालुका पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद परिसरात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना टाकेद येथील विजय बांबळे हा युवा शेतकºयाने पक्षी व प्राण्यांसाठी आगळा वेगळा अनोखा उपक्र म राबविण्यास सुरु वात केली आहे.

Unique farmer of Taked farm | टाकेद येथील शेतकऱ्याचा अनोखा उपक्र म

टाकेद येथील शेतकऱ्याचा अनोखा उपक्र म

Next
ठळक मुद्देइगतपुरी : वन्य प्राण्यांसह भागवली मुक्या जनावरांची तृष्णा

सर्वतीर्थ टाकेद : धरणांचा तालुका पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद परिसरात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना टाकेद येथील विजय बांबळे हा युवा शेतकºयाने पक्षी व प्राण्यांसाठी आगळा वेगळा अनोखा उपक्र म राबविण्यास सुरु वात केली आहे.
वन्य परिसंस्थेतील जंगलातील प्राण्यांसाठी पशु व पक्षांसाठी टाकेद येथील करंजीचा ओहोळ असलेल्या पात्रात एका पसरट आणि खोलगट खडकाच्या मध्यवर्ती खड्यात स्व:ताच्या विहिरीतील पाणी टँकरद्वारे पाईपद्वारे आणून या खड्यात सोडले व टँकरद्वारे सोडलेले पाणी या खडकाच्या खोलगट भागात साठवून मुक्या प्राण्यांच्या पाणी प्रश्नाला खर्या अर्थाने नवसंजीवनी देण्याचा अनोखा उपक्र म केला आहे. या साठवलेल्या पाण्याच्या ठिकाणी जवळपास या परिसरातील दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन बहुसंख्य गाई, गुरे, वासरे, पशु, पक्षी, वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी गर्दी करत आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत वाढत्या तळपत्या उन्हात विहिरींनी कुपनलिकांनी तळ गाठला असतांना एकीकडे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही, तर मुक्या जनावरांकडे कोणीही लक्ष देत नाही स्थानिक प्रशासनाकडून ना मुक्या गुरा वासरांना पिण्याचे पाणी ना चारा छावणी त्यामुळे अश्या भयानक तीव्रतेच्या दुष्काळी परिस्थितीत प्राण्यांची दखल गांभीर्याने लक्षात घेऊन खºया अर्थाने या शेतकºयाने प्राण्यांची तृष्णा भागवून त्यांना नवसंजीवनी दिली आहे.
यंदा सर्वत्र राज्यात दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जनतेला दुष्काळाचा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतांना दुष्काळग्रस्त भागात स्थानिक प्रशासनासह शासन टँकरद्वारे जनतेला पाणी पाजत आहे पण याठिकाणी मानसांचाच विचार केला जात असतांना मुक्या प्राण्यांचा आजपर्यंत कोणीही विचार केला नाही असे मला दिसते. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात रानातील मुक्या प्राण्यांसाठी पशु पक्षांसाठी त्यांची तहान भागविण्यासाठी माङयाकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून मी हा उपक्र म राबवत आहे. वन्य परिसंस्थेचा ºहास होत असतांना आतातरी याचा आपण सर्वांनी विचार करावा व असाच उपक्र म सर्वत्र आवश्यक तेथे राबविला पाहिजे.
- विजय बांबळे,
शेतकरी, सर्वतीर्थ टाकेद बु.

 

Web Title: Unique farmer of Taked farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.