अस्वस्थ आमदार हिरेंचा भाजपावर भरवसा नाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:02 PM2018-01-06T18:02:01+5:302018-01-06T18:07:30+5:30

सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली.

Unhealthy legislator is confident of BJP's defeat! | अस्वस्थ आमदार हिरेंचा भाजपावर भरवसा नाय !

अस्वस्थ आमदार हिरेंचा भाजपावर भरवसा नाय !

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचार सुरू भाजपा या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दईलच याचा भरवसा नाही

नाशिक : विधानसभा व लोकसभा निवडणुकीला अजुन दिड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपा समर्थक आमदार अपुर्व हिरे यांना मात्र भाजपा या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दईलच याचा भरवसा नसल्याने की काय त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवसांपुर्वी आपल्याच सरकारच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी केलेल्या आंदोलनाला स्वयंस्फुर्तीने कार्यकर्त्यांनिशी हजेरी लावल्यानंतर हिरे यांनी आता रविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्या राजकीय भुमिकेवर सा-यांचेच लक्ष लागून आहे.
स्वत: हिरे यांनीच आपल्यातील अस्वस्थता निवडक पत्रकारांसमोर व्यक्त करतांना होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाने आपल्याला उमदेवारी दिली तर बरेच नाहीतर निवडणुक तर लढवणारच असे एकतर्फी जाहीर करताना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची ते ऐनवेळी जाहीर करू असे सांगून त्याबाबतचे गुढ कायम ठेवले आहे. सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली. नाशिक जिल्ह्यात एकेकाळी हिरे घराण्याचे असलेल्या राजकीय वर्चस्वाचा भाजपाला फायदा होईल असे मानले जात असताना, प्रत्यक्षात भाजपाकडून मात्र हिरे बंधूंना मानसन्मान मिळत नसल्याच्या त्यांच्या समर्थकांच्या भावना आहेत. त्यातूनच आगामी काळातही अपुर्व हिरे यांना पक्षाकडून मंत्री वा महामंडळ मिळेल अशी आता खात्री दिसत नसल्यामुळेच की काय गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा भाजपाशी दुरावा वाढत चालला असून, त्यातूनच त्यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयात लावलेल्या भाजपा नेत्यांच्या तस्वीरीही अडगळीत टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीची एक प्रकारे माहितीच त्यांनी पत्रकारांसमोर उघड केली. रविवारी नाशिकच्या श्री कालिका मंदिराचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचे आमदार हिरे यांनी जाहीर केले आहे, मात्र आपल्या आमदारकीचे अजुन सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, अद्याप भाजपा आपण सोडलेली नाही. परंतु प्रचार करतांना भाजपाच्या नावाने नव्हे तर हिरे कुटुंबियांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाच्या नावेच करण्यात येणार असल्याचे सांगून हिरे यांनी गुढ कायम ठेवले आहे.

Web Title: Unhealthy legislator is confident of BJP's defeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.