विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:32 PM2017-11-12T23:32:06+5:302017-11-12T23:33:32+5:30

शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

undefined | विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग

विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी सटाणा शहरात बेकायदा पार्किंग

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप व्यक्तरोज छोटे-मोठे अपघात होण्यास भर वाहनांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत

सटाणा : शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक पोलीस आणि नगरपालिका प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने उपाययोजना करून व वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरपर्यंत वाहतुकीचा मोठा बोजवारा उडतो. या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनधारक बेशिस्तपणे आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभ्या करून आपल्या कामासाठी निघून जातात. परिणामी येणाºया व जाणाºया वाहनांची मोठी कोंडी होते. यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होण्यास भर पडते. रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि हातगाड्यांच्या सापळ्यात अडकणाºया पादचाºयांना चालणेही मुश्कील होते. या मार्गावर शासकीय कार्यालये, बस स्टॅण्ड, शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुल, छोटी- मोठे दुकाने, हॉटेल, बँक, पेट्रोल पंप आहेत. स्टेट बँकेत येणारे अनेक जण रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. बँकेत जाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागते. वाहने पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच आपली वाहने पार्किंग करतात. यातही शहर रिक्षा स्टॅण्ड, मालेगाव, देवळा, ताहाराबाद, वीरगाव, डांगसौंदाणे, कंधाणे, नामपूर या गावाला जाण्यासाठी या रस्त्यावरच काळी पिवळी टॅक्सी, रिक्षा स्टॅण्ड, माल वाहतूक रिक्षा स्टॅण्ड आहेत. टॅक्सीचालक व रिक्षाचालक प्रवाशांना रस्त्याच्या एका बाजूला न उतरविता रस्त्यावरच उतरविले जाते व आपले वाहनही बेशिस्तपणे पार्किंग करतात. बसस्थानक मोठा परिसर असल्याने अनेक नागरिक सुरक्षेच्या कारणाकरिता आपली दुचाकी व चार चाकी वाहने पार्किंग करून बाहेरगावी निघून जातात. हा रस्ताही अरूंद असल्याने मोठ्या वाहनांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत होते. ही पार्किंगची समस्या बस स्टॅण्डसमोरील सुभाष रोड क्र . १, २, ३ व टीडीए रोडवरील महात्मा फुले पुतळ्याजवळ अनधिकृतपणे आपले चार चाकी वाहन पार्किंग करतात. येथेही वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.