पंचवटीतून मालट्रकसह दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:43 AM2019-02-15T00:43:18+5:302019-02-15T00:44:27+5:30

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, पंचवटी परिसरातून मालट्रक, नांदूर नाका व मेनरोडवरून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

Two-wheelers stolen from Panchavati with a truck | पंचवटीतून मालट्रकसह दोन दुचाकींची चोरी

पंचवटीतून मालट्रकसह दोन दुचाकींची चोरी

Next

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, पंचवटी परिसरातून मालट्रक, नांदूर नाका व मेनरोडवरून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
पंचवटी, आडगाव, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, मुंबई नाका अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज एकापेक्षा अधिक घटना घडत आहेत. रासबिहारी-मेरी लिंकरोड भागात राहणारे लक्ष्मण सोनवणे यांच्या मालकीचा मालट्रक (एमएच १५, सीके ४०६३) मंगळवारी चक्क त्यांच्या घरासमोरून चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत आडगाव नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका परिसरात राहणारे रघुराम रमेश प्रजापती यांच्या मालकीची दुचाकी स्प्लेंडर (एमएच १५, सीएल ०८६१) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही दुचाकीदेखील त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिसºया घटनेत मेनरोडवरून प्रकाश नारायण बकरे यांच्या मालकीची स्प्लेंडर (एमएच १५, सीओ १८२५) सकाळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच कॉलेजरोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या आवारातूनदेखील एक दुचाकी चोरी करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीत
५० हजारांची रोकड लंपास
पंचवटी : मालेगाव स्टॅन्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैशांची बॅग पोहोचवण्यासाठी जाणाºया इसमाच्या हातातून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालेगाव स्टॅन्डवरील एका पेट्रोलपंपावर मदतनीस म्हणून काम करणाºया हिरावाडी येथील चेतन सुरेश चावरे याच्याकडे बुधवारी (दि.१३) रात्री व्यवस्थापक आनंदराव सुर्वे यांनी पेट्रोलपंपावर जमा झालेली रोकड चिंचबनात पोहचविण्यासाठी पाठविले. दरम्यान, एका कापडी बॅगमध्ये रोकड घेऊन दीपज्योती अपार्टमेंटमधील प्रकाश मुनोत यांच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चेतन याने रोकडची बॅग अ‍ॅक्टिवाच्या डिक्कीत ठेवली. त्यासोबत दुसरा सहकारी प्रशांत धुळे यालाही घेतले. हे दोघेही चिंचबन परिसरात पोहोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अ‍ॅक्टिवा उभी करून ते रोकड असलेली बॅग मुनोत यांच्याकडे घेऊन जात असताना जॅकेट घातलेले व नाका- तोंडाला रु माल बांधलेले पल्सर गाडीवरून जाणाºया दोघांनी जवळ येऊन हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या दोघांनी आरडाओरड केली मात्र भामट्यांनी बॅग हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीच म्हटले आहे. बॅगमध्ये ५० हजार रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two-wheelers stolen from Panchavati with a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.