भाजपा विस्तारकांना देणार दुचाकी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:18 AM2017-11-27T00:18:09+5:302017-11-27T00:20:50+5:30

लोकसभा निवडणुकीस दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, संघटनात्मक बांधणीवर लक्ष्य केंद्रित केले आहे़ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील पक्ष पदाधिकाºयांच्या बैठका घेत आहेत़

 Two-wheeler gift to BJP expatriates | भाजपा विस्तारकांना देणार दुचाकी भेट

भाजपा विस्तारकांना देणार दुचाकी भेट

Next
ठळक मुद्देनिवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील पक्ष पदाधिकाºयांच्या बैठका शहर पदाधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीस दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, संघटनात्मक बांधणीवर लक्ष्य केंद्रित केले आहे़ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील पक्ष पदाधिकाºयांच्या बैठका घेत आहेत़ औरंगाबाद विभागाची बैठक झाल्यानंतर रविवारी (दि़२६) उत्तर महाराष्ट्रातील अर्थात नाशिक विभागातील पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली़ यामध्ये आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाºया पक्ष विस्तारकांना दुचाक्या देण्यात येणार असल्याचे दानवे यांनी बैठकीत सांगितले़ दरम्यान, १ डिसेंबरपासून मंडल अधिकारी व त्यानंतर शहर पदाधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे़  इगतपुरी व त्र्यंबक नगरपालिका वगळता कोणत्याही निवडणुका नसताना भाजपाने संघटनात्मक उद्देशासाठी राज्यात विभागवार पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे़ राज्यातील ९१ हजार बूथ गठित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित ३० टक्के बूथसाठी कार्यकर्त्यांना बोलावून निर्देश दिले जात आहेत़ राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात काम करणाºया पक्ष विस्तारकांना कामात सुलभता यावी, यासाठी पक्षाने प्रत्येकास दुचाकी देण्याचा निर्णय घेतला आहे़ पक्षाकडून दिल्या जाणाºया या दुचाकी या विस्ताकांच्या नावावर असणार आहेत़ या विस्तारकांनी आपला दैनंदिन अहवाल मुंबईतील पक्षाच्या वाररूमकडे द्यावयाचा आहे़  भारतीय जनता पक्षाने गत निवडणुका या पक्षबांधणीवर जिंकल्या असून, पुढील निवडणुकाही संघटनेच्या जोरावर जिंकण्याचे पक्षाचे ध्येय आहे़ नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी बैठकीत दानवे यांनी पक्षासाठी काम न करणाºयांची तसेच कामासाठी इच्छुकांची नावे त्वरित कळवा यासाठी जिल्हाध्यक्षांचीही वाट पाहू नका, अशा सूचना केल्या़ विशेष म्हणजे या यादीस तत्काळ मान्यता दिली जाणार असून, स्थानिक पातळीवर पद न मिळालेल्यांना केंद्रात तसेच राज्यातील पद दिले जाणार आहे़ पक्षाने विशेष कार्यकारी केलेल्यांनी शिक्क्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा न मारता बाहेर अडीच रुपयात शिक्का तयार करून मिळतो तो करून घ्या व काम सुरू करा, अशा सूचनाही केल्या़  नाशिक शहर व ग्रामीण पदाधिकाºयांच्या बैठकीत चार-पाच पदाधिकाºयांनी आपल्या सूचना मांडल्या़ त्यामध्ये एका महिला पदाधिकाºयाने, महिलांच्या कमी संख्येबाबत मांडलेल्या मुद्द्यावर महिलांमध्ये अधिक जिद्द असते त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात आणा त्यासाठी राजकारणात आल्यानंतर काय सवलती मिळतात याचे महत्त्व पटवून द्या, यासाठी त्यांनी एका महिलेचे उदाहरणही सांगितले़ पूर्वी कार्यकर्त्यांसाठी झालेल्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा उपयोग झालेला नसून येत्या एक डिसेंबरपासून पुन्हा प्रशिक्षण घेतले जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़ हॉटेल रॉयल हेरिटेज येथे झालेल्या या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी बैठकीत सर्वप्रथम नाशिक महानगर, ग्रामीण व मालेगावच्या पदाधिकाºयांची बैठक झाली़ या बैठकीस बाळासाहेब सानप, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी, सुनील गायकवाड, दादासाहेब जाधव उपस्थित होते़ या बैठकीत धुळे शहर व ग्रामीण, नंदुरबार, अहमदनगर शहर व ग्रामीण, जळगाव शहर व ग्रामीण यातील पदाधिकारी उपस्थित होते़ 
संघटनात्मक रचना सांगा अन् दुचाकी मिळवा : दानवे 
नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी बैठकीत भाजपाच्या कार्यकर्त्याला पक्षाची संघटनात्मक रचना, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या या सर्व बाबींची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले़ यावेळी उपस्थितांपैकी जो कोणी तालुकाध्यक्ष कार्यकारिणीची रचना सांगेल त्यास एक मोटारसायकल बक्षीस देण्याचीही घोषणा केली़ मात्र, एकही कार्यकारिणी रचना सांगू शकला नाही त्यामुळे अखेर दानवे यांनी तालुकाध्यक्षांमध्ये मोटारसायकल जिंकण्याची हिंमत नसल्याचे सांगत स्वत:च कार्यकारिणीची रचना समजावून सांगितली़

Web Title:  Two-wheeler gift to BJP expatriates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.