दुचाकीचोरट्या युवकास  पाठलाग करून  पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:04 AM2018-09-22T01:04:33+5:302018-09-22T01:04:50+5:30

पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकाची मोटारसायकल चोरणाऱ्या युवकास पाठलाग करून पकडण्यात आले. वडनेर दुमाला समर्थ बंगलो येथील प्रकाश बंडू पोरजे हे गेल्या गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या मावस बहिणीस भेटण्यासाठी गेले होते.

Two-wheeled teenager was caught and chased | दुचाकीचोरट्या युवकास  पाठलाग करून  पकडले

दुचाकीचोरट्या युवकास  पाठलाग करून  पकडले

Next

नाशिकरोड : पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकाची मोटारसायकल चोरणाऱ्या युवकास पाठलाग करून पकडण्यात आले.
वडनेर दुमाला समर्थ बंगलो येथील प्रकाश बंडू पोरजे हे गेल्या गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या मावस बहिणीस भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली हिरोहोंडा सीडी डिलक्स (एमएच १५ बीएस ६२७) ही हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली होती. प्रकाश पोरजे व त्यांचा चुलत भाऊ स्वप्नील बहिणीला भेटून दवाखान्याबाहेर आले असता एक अज्ञात युवक त्यांची मोटारसायकल सुरू करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोरजे बंधूंनी चोर चोर म्हणून आवाज दिल्याने त्या ठिकाणाहून गस्त घालणाºया दोघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोटारसायकल चोरून पळून नेण्याचा प्रयत्न करणारा संशयित कुणाल कैलास गायखे (१८) रा. बंगाली बाबा स्टॉप देवी चौक, गायखे मळा पळसे यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeled teenager was caught and chased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.