महामार्गावर लूट करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:13 AM2019-05-06T00:13:08+5:302019-05-06T00:13:40+5:30

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर वाहने अडवून वाहनचालकांना दमबाजी करत लूटमार करणारे दोघे संशयित स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून लुटलेली रोकड व डिझेल कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

Two robbers robbed on the highway | महामार्गावर लूट करणारे दोघे ताब्यात

नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला इगतपुरी ट्रकचालक लूट प्रकरणातील संशयित़ 

Next
ठळक मुद्देएक अल्पवयीन : ग्रामीण गुन्हे शाखेकडून रोकड जप्त

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर वाहने अडवून वाहनचालकांना दमबाजी करत लूटमार करणारे दोघे संशयित स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून लुटलेली रोकड व डिझेल कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी शिवारात राठी पेट्रोलपंप परिसरात गुरुवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात दोन संशयितांनी मालवाहू ट्रेलर (एमएच ४६ एएफ ५१३४) रोखला. त्यावरील चालक जगन्नाथ जोकुलाल गौतम (रा. मेडरा. सोराव, उत्तर प्रदेश) यास वाहनातून खाली ओढून मारहाण केली. तसेच त्याच्या हातावर चाकूने वार करून सात हजार रुपये व भारत पेट्रोलियम कंपनीचे डिझेल कार्ड जबरीने लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा अज्ञात संशयितांविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, नवनाथ गुरुळे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंद्रे, संदीप हांडगे, हेमंत गिलबिले आदींच्या पथकाने माणिकखांबमध्ये सापळा रचला. या सापळ्यात दोघे संशयित गोकुळ फुलचंद गांगड (२०) व त्याचा अल्पवयीन साथीदार अडकले. त्यांची कसून चौकशी केली असता एका अल्पवयीन साथीदारासह दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका ट्रकचालकाला मारहाण करून रोकड लुटल्याची कबुली दिली. गुप्त माहितीच्या आधाराने तपासपोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्णाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. शनिवारी (दि.४) पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा करणारे गुन्हेगार इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब परिसरात वास्तव्यास असल्याची बातमी मिळाली.

Web Title: Two robbers robbed on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.