रंधवा यास बारा दिवसांची कोठडी

By admin | Published: September 2, 2016 11:20 PM2016-09-02T23:20:49+5:302016-09-02T23:21:07+5:30

लष्कर भरती प्रकरण : बनावट कागदपत्राद्वारे सरकारची फसवणूक

Twelve days of randhawa | रंधवा यास बारा दिवसांची कोठडी

रंधवा यास बारा दिवसांची कोठडी

Next

नाशिकरोड : नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमधील भरतीप्रकरणी मुख्य सूत्रधार व निवृत्त कर्नल सुखप्रितसिंग अर्जुनसिंग रंधवा याला आज नाशिकरोडच्या न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली.
रंधवाला दिल्लीहून ताब्यात घेऊन गुरुवारी उपनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता बारा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी रंधवासह पाच जणांना अटक झाली आहे. रंधवा हा सूत्रधार आहे. त्याला उपनगरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, महेंद्र जाधव, कोकाटे व देशमुख यांच्या पथकाने दिल्लीहून रेल्वेने आणले. संशयिताने बनावट कागदपत्रे सादर करून लष्करी प्रशासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
बलवीर गुजर (२२) राजस्थान, सचिन किशन सिंह राजस्थान, तेजपाल चोपडा राजस्थान, सुरेश महंतो व गिरीराज घनश्याम चौहान अशी या अगोदर अटक केलेल्यांची नावे आहेत. ते जेलमध्ये आहेत. राजस्थानचा रहिवासी असलेला चौहान हा दिल्लीतील राजपुताना रायफल्समध्ये होता. लष्करी प्रशासनाला भरतीची कागदपत्रे खरे असल्याचे भासवून या टोळीने आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरू केले होते. चौहानच्या सहाय्याने तिघांनी आर्टिलरी केंद्रात प्रवेश करून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

Web Title: Twelve days of randhawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.