नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:25 AM2019-07-22T00:25:46+5:302019-07-22T00:26:05+5:30

आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

 Turn to business rather than work: Mahesh Jigade | नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

Next

नाशिक : आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने नोकऱ्यांच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे, असे मत माजी महसूल आयुक्त महेश झगडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात माळी समाज सेवा समितीच्या वतीने माळी समाजातील पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ रविवारी (दि.२१) सकाळी पार पडला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद उपस्थित होते.
यावेळी झगडे म्हणाले की, एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर खचून न जाता मुलांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून पुढे गेले पाहिजे. आमदार पंकज भुजबळ यांनी पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणू नये. यावेळी अशोक खलाणे, ताराचंद गहलोत, विनय सैनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे मनसे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, सेवाराम दगडी, विजय राऊत, शेफाली भुजबळ, माजी उपअधीक्षक भूमीअभिलेख दिलीप चौधरी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, बाळासाहेब जानमाळी, नीलिमा सोनवणे, माधुरी बोलकर, उत्तमराव बडदे, प्रभाकर क्षीरसागर, हरिश्चंद्र विधाते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश निकम व जागृती कोलगीकर यांनी केले तर आभार उत्तमराव बडदे यांनी मानले.

Web Title:  Turn to business rather than work: Mahesh Jigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक