नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 11:19 AM2018-02-09T11:19:28+5:302018-02-09T11:32:54+5:30

तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे

Tukaram Mundhe takes charge of Nashik Muncipal Corporation commissioner | नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ

नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ

Next

नाशिक - तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. बरोबर 10 वाजता तुकाराम मुंढेंनी महापालिकेत प्रवेश केला. कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी कार्यालयात हजर होत पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं. बरोबर 10 वाजण्याच्या ठोक्याला तुकाराम मुंढे त्यांच्या दालनात हजर झाले होते. यामुळे कर्मचारी आणि अधिका-यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. 

तुकाराम मुंढे सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती मिळताच गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिका-यांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली होती. मात्र, आयुक्तांनी स्वाक्ष-या करण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, अनेकांना चिंताक्रांत चेह-यांनी मुख्यालयातून माघारी परतावे लागल्याची चर्चा होती.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली. पीएमपी नावाने परिचित असणा-या या नागरी प्रवासी वाहतुकीत शिस्त आणण्याचे प्रयत्न करणा-या मुंडे यांना आता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे. तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. आयएएस अधिकाºयांना सध्या दोन महिन्यातच बदलले जात आहे तेथे तुकाराम मुंढे यांना १० महिने पुण्यात मिळाले. पीएमपीमध्ये नगरसेवकांनीच त्यांच्या वशिल्याने कंत्राटी कामगारांची भरती केली होती. त्यातील काम न करणाºया २५० कंत्राटी कामगारांना मुंडे यांनी कामावरुन कमी केले होते. पीएमपीच्या इमारतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे कार्यालय होते. ते हटविण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली होती. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले. मुंडे यांच्या जागी नैना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली करण्यात आली होती ; पण ती भाजपा नेत्यांनीच रद्द करायला लावली. त्यामुळे त्या जागी आता एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुरुंदकर ३१ आॅगस्ट २०१८ ला निवृत्त होत आहेत. पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेमा देशभ्रतार यांची बदली सामाजिक न्याय विभागात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे. दूध फेडरेशन (महानंद)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी दिपककुमार मिना यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Tukaram Mundhe takes charge of Nashik Muncipal Corporation commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.