त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:54 AM2017-12-15T00:54:34+5:302017-12-15T00:54:56+5:30

त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका युवकाने हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना कुशावर्त चौकात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.  लोहगावकर हे मित्रांसमवेत गप्पा मारीत असताना पाठीमागून आलेल्या प्रदीप अडसरे याने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली. 

 Trumpet's mayor killed | त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण

त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण

Next

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका युवकाने हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना कुशावर्त चौकात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.  लोहगावकर हे मित्रांसमवेत गप्पा मारीत असताना पाठीमागून आलेल्या प्रदीप अडसरे याने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली.   त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण  त्यात त्यांच्या गळ्याला नखे लागून खरचटले आहे. सदर प्रकार घडताच नाशिक येथील भाजपाच्या पदाधिकाºयांनी घटनेची माहिती घेऊन लोहगावकर यांना तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचे सूचविले होते. त्यानुसार लोहगावकर यांच्यासह त्र्यंबक शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात २धाव घेतली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, सुरेश गंगापुत्र, तेजस ढेरगे, भाजपा-आरपीआयचे शांताराम बागुल, रवींद्र सोनवणे, समीर पाटणकर, रामायणे आदी उपस्थित होते. अडसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे लोहगावकर कुटुंबात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी लोहगावकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हल्ला करणाºया युवकाशी माझे कोणतेही वैर अथवा संबंध नसतानाही त्याने माझ्यावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. मला मारहाण करतांना कुटुंबातातील महिला, माझे बंधु व मित्र परिवार अडसरे याच्या हातून माझी सुटका करीत असतांना त्याने महिलांना देखील मारहाण केली असून आमच्या जीवास धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.  सदर प्रकरण अजुन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत. 
लोहगावकर यांच्या फिर्यादीनंतर त्र्यंबकेश्वर शहर भाजपाचे अध्यक्ष शामराव गंगापुत्र व त्यांचे बंधु सुरेश गंगापुत्र यांनीही पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.   अडसरे याने एक-दीड महिन्यांपूर्वी लोहगावकर यांना अशाच प्रकारची मारहाण केली होती. मात्र त्यावेळी केवळ समज देऊन ते प्रकरण मिटविण्यात आले होते.

Web Title:  Trumpet's mayor killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.