पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:38 PM2018-08-21T12:38:42+5:302018-08-21T12:38:54+5:30

नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील चिववटीबरीतला धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

Tourist places in Pandava, Chivabari, tourists | पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना

पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना

googlenewsNext

नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील चिववटीबरीतला धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. तालुक्यातील पश्चिम पट्टा व त्याला लागून गुजरातचा डांग परिसर सर्वदूर हिरवाईने नटलेला आहे.त्यामुळे साहजिकच पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. साल्हेर ,मुल्हेर ,नाव्ह्या किल्ला चिवटीबारी परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे.या पावसामुळे या भागातील डोंगर दर्यातून वाहत असलेले छोटेमोठे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहे.यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून या भागात पर्यटकांनी चांगली गर्दी केली आहे.या भागातील पांडवा व चिववटीबारीतील धबधबे हे प्रमुख आकर्षण आहे.
-------------------------
कसे जाणार पांडव्याला......
बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतराव पांडवा आहे.पांडव्याला जाण्याचे दोन मार्ग एक साल्हेर मार्गे मानूर ,गडद मार्गे पांडवा दुसरा मार्ग मुल्हेर ,बाभूळणे ,चिंचलीघाटातून पांडव्याला जाता येते.साल्हेर वरून गेल्या साल्हेर किल्ला बघता येतो.तसेच येथील गणपतीघाटा समोरील रिटर्न फॉल बघायला मिळतो .मानूर मार्गे जातांना गडद येथील गिधाडसाठी संरिक्षत प्रकल्प बघायला मिळेल.तेथून पांडवा येथील घनदाट जंगल आण ितेथील धबधबे आकर्षण आहे.पांडवा येथील भर जंगलात दुमजली ब्रिटिशांनी बांधलेले विश्रामगृह आहे.या विश्रामगृहच्या दक्षिणेला डोंगरावर दोन किलोमीटर अंतरावर पांडवा धबधबा आहे.धबधब्या कडे जाण्यासाठी पूर्ण चढाईचा मार्ग आहे.या जंगलातील गुहांमध्ये पांडवांचे अनेक वर्ष वास्तव्य होते.त्यामुळेच याभागाला पांडवा नावाने ओळखले जात असल्याची आख्यायिका आहे.घनदाट जंगलातील डोंगर कपारातून सुमारे साठ फुट उंचीवरून कोसळणार्या धबधब्याच्या धारा पर्यटकांना आकर्षित करतात.याच धबधब्यावर पडणार्या सूर्यिकरणामुळे इंद्रधनुष्य मोहून घेत असतो.या धबधब्याला लागुनच पांडवांचे वास्तव्य असलेल्या मोठमोठ्या गुहा आहेत.येथे भाविक पूजाअर्चा देखील करतात.धबधबा पाहण्यासाठी वनविभागाने पायर्या तयार केल्या आहेत. चिवटीवारीतील नेकलेस फॉल देखील आकर्षण आहे.बागलाण तालुक्यातील मुल्हेर गापासून उत्तरेकडे सुमारे आठ किलोमीटर अंतरावर बोर्हाटे गाव आहे.या गावाची हद्द आण िधुळे जिल्ह्याच्या सीमेवर हा नेकलेस फॉल बघायला मिळतो ,छोटेछोटे धबधबे तर अनेक आहेत.परंतु बारीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरदर्यांतून हा नेकलेस फॉल सर्वाचेच आकर्षण आहे.सुमारे अडीचशे फुट उंचीवरून हा धबधबा वाहतो.बारीच्या पूर्वेकडून पाचशे फुट खोल दरीतून पायवाटेने या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे.या भागात मोर ,ससे,बिबटे ,लांडगे तसेच निरनिराळे पक्षी देखील बघायला मिळतात. यामुळे ही सफर नक्कीच यादगार होते.

Web Title: Tourist places in Pandava, Chivabari, tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक