पर्यटनस्थळाचा विकास म्हणजे शहराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:20 AM2018-10-21T00:20:20+5:302018-10-21T00:21:23+5:30

वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले.

Tourist development is the development of the city | पर्यटनस्थळाचा विकास म्हणजे शहराचा विकास

पर्यटनस्थळाचा विकास म्हणजे शहराचा विकास

Next
ठळक मुद्देगणेश देशमुख : काळाराम मंदिर नूतनीकरणाचा शुभारंभ

श्री काळाराम नूतनीकरणाचा शुभारंभ करताना जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख. समवेत बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, महापौर रंजना भानसी, दिनकर पाटील, मधुकर कड, पुष्पा दीदी आदी.
पंचवटी : वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्थानचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले.
आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून पर्यटन विभाग निधी अंतर्गत श्री काळाराम मंदिर सुशोभिकरण तसेच लेझर शोच्या कामाचे भूमिपूजन, रथ उभा करण्यासाठी शेड बांधणे, कपालेश्वर मंदिर विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी होत्या. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, विजय साने, नरसिंहदास, पुष्पादीदी, दिनकर पाटील, तुळशीराम गुट्टे, महंत रामसनेहीदास, महंत भक्तिचरण, नगरसेवक गुरमित बग्गा, पोलीस निरीक्षक मधुकर कड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख यांनी सांगितले की, नाशिकला काळाराम मंदिरात येणाºया भक्तांसाठी कायमस्वरूपी अन्नछत्र तसेच भक्त निवास उभारण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. भक्तांना चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठी संस्थान प्रयत्नशील असल्याचे ते शेवटी म्हणाले.
आमदार सानप यांनी शहराच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी होत असल्याने खºया अर्थाने विकासकामांची गंगा शहरात आणल्याचे सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक जगदीश पाटील, कमलेश बोडके, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, हेमंत शेट्टी, पुंडलिक खोडे, शांता हिरे, प्रियंका माने, पूनम मोगरे, विमल पाटील, सरिता सोनवणे, नंदिनी बोडके उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Tourist development is the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.