टोमॅटोचे भाव घसरलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 02:26 PM2018-11-24T14:26:36+5:302018-11-24T14:26:48+5:30

दिंडोरी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले असून हंगामात सुरूवातीपासूनच बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Tomato prices fall! | टोमॅटोचे भाव घसरलेलेच !

टोमॅटोचे भाव घसरलेलेच !

Next

दिंडोरी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले असून हंगामात सुरूवातीपासूनच बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजारपेठेत विक्र ीसाठी नेलेला टोमॅटोला योग्य बाजार भाव मिळत नसल्यामुळे लागवडीसाठी व मजूरीसाठी केलेला खर्च निघनेही दुरापास्त झाले आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोला ३० ते ४० रु पये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत होता. टोमॅटोची लागवड, भरघोस उत्पादन मिळावे यासाठी महागङी औषधे फवारणी, रासायनिक खते,व मजुरीसाठी करण्यात आलेला खर्च देखील या कमी बाजार भावामुळे सुटत नसल्याने, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांनी ग्रासले आहे . दिंडोरी तालुक्यातील स्थानिक मार्केट व नाशिक मार्केटमध्ये टोमॅटो विक्र ीसाठी बाजारात नेल्यानंतर जाळीला केवळ ५० ते ८० रु पये असा अल्पदर मिळत असल्याने बियाणे, लागवड खर्च तसेच वाहतूक भाडे देखील सुटत नसल्याने यंदा शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

Web Title: Tomato prices fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक