नाशिकमध्ये एकाच रात्रीत तीन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 01:49 AM2017-12-28T01:49:32+5:302017-12-28T07:30:03+5:30

नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला.

Three murders in Nashik in one night | नाशिकमध्ये एकाच रात्रीत तीन खून

नाशिकमध्ये एकाच रात्रीत तीन खून

Next

नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळते आहे. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पहिली घटना रात्री साडेनऊ वाजता अंबडमधील रिक्षाचालक साहेबराव जाधव याच्यासोबत घडली. साहेबरावावरील हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभफुटी रस्त्यावर झाली . भांडणाची कुरापत काढत अज्ञात संशयितांनी धारदार हत्याराने दोघांवर हल्ला केला, यात देविदास इगे व दिनेश नीलकंठ बिरासदर यांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील असल्याची माहिती मिळते आहे.

Web Title: Three murders in Nashik in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा