शहरात तीन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:27 AM2018-12-14T01:27:58+5:302018-12-14T01:28:13+5:30

शहरात दुचाकीचोरीच्या घटना सुरूच आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसला महाविद्यालय, गंगापूरगाव परिसरातून दोन दुचाकीचोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.

Three bicycle theft in the city | शहरात तीन दुचाकींची चोरी

शहरात तीन दुचाकींची चोरी

Next
ठळक मुद्देचोरट्यांचा उपद्रव : पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

नाशिक : शहरात दुचाकीचोरीच्या घटना सुरूच आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसला महाविद्यालय, गंगापूरगाव परिसरातून दोन दुचाकीचोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कपिल विजय महाडिक (२३, हिरावाडी) या तरुणाच्या मालकीची तीस हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम.एच१५ सीयू १९६१) भोसला महाविद्यालयासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी महाडिक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत गंगापूर गावातील क्रांतिचौकातून राजू संजय साबळे यांच्या मालकीची सुामरे ४० हजार रुपये किमतीची होंडा डिलक्स दुचाकी (एमएच२८ बी.सी ४५९५) अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गंगापूररोड, आनंदवली, उंटवाडी, कॉलेजरोड, सावरकरनगर या भागातून सातत्याने वाहनचोरी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच घरासमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली इनोव्हा कार चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली होती. एकूणच वाहनचोरीमुळे संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी या भागात गस्त वाढवून वाहनचोरीचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
तिसºया घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीतून ५० हजार रुपये किमतीची होंडा पॅशन-प्रो ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मिलिंद बिडगर (३४, वृंदावननगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या तीन घटनांमधून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

Web Title: Three bicycle theft in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.