मनेगाव येथील आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM2018-04-26T00:17:18+5:302018-04-26T00:17:18+5:30

शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट ओढवेल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली.

The thieves on the mango garden in Manegaon | मनेगाव येथील आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला

मनेगाव येथील आंब्याच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला

Next

सिन्नर : शेतकऱ्यांवर कधी आणि कसे संकट ओढवेल हे सांगता येत नाही. याची प्रचिती मनेगाव येथील शेतकºयाला आली. पाच वर्षे मेहनत घेऊन फुलविलेल्या केशर आंब्याचे पीक तोडणीला आल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी बागेवर डल्ला मारल्याची घटना घडली. चोरट्यांनी ९८० झाडांचे आंब्याचे फळ चोरून नेल्याने शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील कचरूशिवाजी सोनवणे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पाटोळे शिवारात सुमारे अडीच हेक्टर जागेवर केशर आंब्याची २०१३ साली लागवड केली. पाच वर्षे काबाडकष्ट करून ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देऊन केशरबाग फुलवली. यावर्षी ९८० झाडांना आंबा चांगलाच लगडला होता. आदल्या दिवशी सायंकाळी सोनवणे यांनी बागेत फेरफटका मारला होता. सकाळी मुलगा बागेत गेल्यानंतर त्यास कैºया व पालापाचोळा पडलेला दिसला. संशय आल्याने त्याने बागेत फेरफटका मारला. त्यावेळी त्यास झाडाला लागलली फळे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
कष्टाने फुलवली बाग
सोनवणे यांनी पाच वर्षे अतिशय कष्ट घेऊन केशर आंब्याची बाग फुलवली होती; मात्र चोरट्यांनी रात्रीतून सर्व फळे चोरून नेल्याने सोनवणे यांच्यावर संकट कोसळले आहे. सोनवणे यांनी या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली.

Web Title: The thieves on the mango garden in Manegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.