३१ गावांत २२८ विद्युत खांब पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 06:36 PM2019-06-13T18:36:04+5:302019-06-13T18:36:45+5:30

वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरणचे कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे .

There were 228 electrical pole in 31 villages | ३१ गावांत २२८ विद्युत खांब पडले

निफाड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वाकून खाली पडलेला विद्युत खांब यामुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता.

Next
ठळक मुद्देनिफाड उपविभाग : वादळी पावसाचा तडाखा, रोहित्रांचे नुकसान

निफाड : वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरणचे कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे .
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या निफाड उपविभागांमध्ये सहा कक्ष असून या ६ कक्षात एकूण ३१ गावांचा यात समावेश होतो या सहा कक्षामध्ये निफाड शहर, निफाड ग्रामीण, नांदूरमध्यमेश्वर, उगाव पिंपळस, कसबेसुकेणे या कक्षांचा समावेश होतो. निफाड तालुक्यात मूग रक्षाचा प्रारंभ करताना दिनांक १० जून रोजी वादळी पावसाने आणि १० जुन रोजी वादळी वाºयाने निफाड तालुक्यात शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलचे, विद्युत वाहन नेणाºया तारांची, ट्रान्सफॉर्मरचे प्रचंड नुकसान झाले.
या नुकसानीमध्ये विद्युत पोल पडणे विद्युत पोल वाकणे, विद्युत वाहून देणाºया तारा तुटणे ट्रान्स्फॉर्मरन जळणे, आदीं नुकसानीचा समावेश होतो या सहा कक्षात लघुदाब वाहिनीवरील १६६ विजेचे खांब पडले आहेत त्यात निफाड शहर कक्षात १३ विजेचे खांब, निफाड ग्रामीण कक्षात ५१ विजेचे खांब, नांदूरमधमेश्वर कक्षात ५६ विजेचे खांब, उगाव कक्षात १८ विजेचे खांब, कसबे सुकेने कक्षात १७ विजेचे खांब असे एकूण १६६ विजेचे खांब पडले आहेत. तर या ६ कक्षातील ३१ गावांत उच्चदाब वाहिनीवरील ६२ विजेचे खांब वादळी वाºयाने पडले आहे. त्यात निफाड शहर कक्षात ३ विजेचे खांब, निफाड ग्रामीण कक्षात २८ विजेचे खांब, नांदूरमधमेश्वर कक्षात २० विजेचे खांब, उगाव कक्षात ८ विजेचे खांब, पिंपळस कक्षात २ विजेचे खांब, कसबे सुकेने कक्षात १ विजेचा खांब असे एकूण ६२ विजेचा खांब पडले आहेत. काही ठिकाणी रोहित्राचे नुकसान झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

३१ गावात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शिवारातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे नुकसानीचा आवाका जास्त असल्याने यंत्रणा पूर्ववत करण्याची कामे अधिक वगाने सुरू आहेत पडलेले सदरची दुरूस्ती करतांना विजेचे खांब दुरूस्त करणे, उभे करणे, तुटलेल्या विद्युत तारा ओढून जोडणे, तुटलेले खांब बदलणे, वाकलेले खांब सरळ करणे ही कामे करावी लागत आहे.
निफाड उपविभागांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, वायरमन हे दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे ही कामे करताना खासगी ठेकेदारांचाही सहकार्य घ्यावे लागत आहे. वादळामुळे पडलेल्या पोलची संख्या १६४ असल्याने सदर पोल उभे करण्यासाठी सर्वाचीच मागणी असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयाची व वायरमन यांची धावपळ उडत आहे.
दि १० जून रोजी काथरगाव येथे विद्युत पुरवठा वादळामुळे खंडित झाला होता वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी रात्री तातडीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रात्री १०.३० वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरू केला.

Web Title: There were 228 electrical pole in 31 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.