शांततेला बाधा आणणाºयांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:04 AM2018-02-17T01:04:34+5:302018-02-17T01:04:49+5:30

तालुक्यातील औद्योगिक वसाहतींत अनेक कर्मचारी व कामगार कामानिमित्त बाहेरील शहरांबरोबरच परराज्यातून आले आहेत. त्यामुळे कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वर्तणूक तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे. औद्योगिक वसाहतीतील शांततेला बाधा आणणाºयांची गय केली जाणार नसल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला.

 There is no hindrance to peace | शांततेला बाधा आणणाºयांची गय नाही

शांततेला बाधा आणणाºयांची गय नाही

Next

सिन्नर : तालुक्यातील औद्योगिक वसाहतींत अनेक कर्मचारी व कामगार कामानिमित्त बाहेरील शहरांबरोबरच परराज्यातून आले आहेत. त्यामुळे कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वर्तणूक तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे. औद्योगिक वसाहतीतील शांततेला बाधा आणणाºयांची गय केली जाणार नसल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला.  माळेगाव येथील निमा सभागृहात उद्योजकांशी कायदा व सुरक्षितता या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, संचालक प्रवीण वाबळे, स्टाईसचे अध्यक्ष अविनाश तांबे, पोलीस निरीक्षक पी.एच. कोल्हे आदी उपस्थित होते. एस.के. नायर, किरण खाबिया, सचिन कंकरेज, मारुती कुलकर्णी, महेंद्र शुक्ला, अजय बहेती, किरण वाजे, समाधान बोडके, संतोष भामरे, बलबीरसिंग छाब्रा, किरण भंडारी, दिनेश करवा, बी.एच. दळवी, सचिन कदम आदी उद्योजकांनी सुरक्षितेतच्या उपाययोजनांबाबत चर्चासत्रात सहभाग घेतला.  औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात मोठे प्रकल्प येण्यासाठी निमा व इतर औद्योगिक संस्था प्रयत्न करीत असून, त्यामुळे शांतता, सुवव्यस्थेला तितकेच महत्त्व असल्याचे मत आशिष नहार यांनी व्यक्त केले. आद्योगिक क्षेत्रात शांततेसाठी भरीव कामगिरी केली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकीच्या जागेसाठी पाठपुरावा सुरू असून कागदपत्रे एमआयडीसी कार्यालयाकडे जमा केल्याची माहिती नहार यांनी दिली.  राज्यासह परप्रांतीय कामगारांची पोलिसांमार्फत वर्तणूक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची झाली असल्याचे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. पोलीस गस्त अधिक सक्षम होण्यासाठी विभागानुसार नोंदवहीवर गस्ती पथकाची स्वाक्षरी नोंद होत आहे. वसाहतीतील अवैध व्यवसाय, अवैधरीत्या उभे असलेले ट्रक व इतर वाहनांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले. वसाहतीत गुंड प्रवृत्तीने वर्गणी गोळा करण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. उद्योजकांनी सदर बाब पोलिसांना कळविल्यास वर्गणी मागणाºयांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना विशाल गायकवाड यांनी केल्या.

Web Title:  There is no hindrance to peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस