शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

By Suyog.joshi | Published: January 18, 2024 04:11 PM2024-01-18T16:11:53+5:302024-01-18T16:12:12+5:30

याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

The city will be clean, Municipal Corporation will now pick up junk vehicles | शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

नाशिक : शहरात महापालिकेच्या हद्दीत किंवा रस्त्यांवर भंगार जुनी दुचाकी, चारचाकी वाहने आढळल्यास महापालिका थेट उचलून आडगाव येथील गुदामात टाकून देणार असून याबाबत फेब्रुवारी महिन्यापासून कारवाई करण्यात येणार आहे.  बेवारस वाहनांचे मालक, चालक, गॅरेजधारक व वापरकर्ते यांच्यासह महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पूल, फूटपाथ, उड्डाणपुल येथे अनधिकृतपणे सोडून दिलेली बेवारस वाहने, नादुरूस्त असलेली वाहने, दुरूस्तीकरता आलेली वाहने इत्याद हटविण्याची कारवाई मनपातर्फे लवकरच हाती घेतली जाणार आहे. तसेच यापुढे सदरची कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.

शहरातील विविध रस्त्यावर धावणा-या वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बाजारपेठांबरोबरच तसेच दाट लोकवस्ती असलेल्या शहरातील मोक्याच्या जागी भंगार विक्रेते तसेच गॅरेजेस यांनी आपली दुकाने भर रस्त्यातच थाटल्याने वाहनचालकांना व पादचा-यांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे. भंगार व्यापा-यांबरोबरच वाहतूक कोंडीला गॅरेजचालकांनीही हातभार लावला आहे. शहरातील अनेक गॅरेजेस हे रस्त्यावरच व्यवसाय करताना दिसतात. शहरातील अनेक ठिकाणी ४० ते ५० फुटी रस्त्यावरून एखादी आॅटो रिक्षा अथवा मोटरसायकल जाऊ शकते.

या रस्त्यावर अनेक गॅरेजचालकांनी ठाण मांडले आहे. या रस्त्यात अनेक भंगार वाहने उभी दिसतात. त्यामुळे तीही हटविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा रिक्षांची कामे सुरू असतात. त्यात इंजिन दुरुस्ती, हूड मेकर, नंबर प्लेट बनवणारे, चेसीज् बाहेर काढणारे, स्पेअर पार्ट विकणारे अशा अनेकांनी भाऊगर्दी केली आहे. या त्यांच्या उद्योगाचा इतर वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो. या गॅरेजचालकांची अनेक वाहने ही भंगारमध्ये जमा करण्यासारखीच असतात. त्यामुळे त्यांनीही मनपाच्या कारवाईचा विचार आहे.

..तर लागणार दंड
महापालिका क्षेत्रातील जागेवर भंगार वाहने दिसल्यास ती थेट आडगावच्या गुदामात टाकली जाणार आहे. ज्या ग्राहकांची काही हरकत असल्यास किंवा आडगाव गुदामात नेली जाणारी वाहने परत न्यायची असल्यास संबंधित मालकांना दंड आकारला जाणार आह, असेही महापालिकेने म्हटले आहे.

महापालिका क्षेत्रातील कोणत्याही जागेवर भंगार वाहने ठेऊ नका. आमच्या मोहिमेत कारवाई करण्यात येईल.
-नितीन नेर, उपायुक्त,
 अतिक्रमण विभाग, मनपा

Web Title: The city will be clean, Municipal Corporation will now pick up junk vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.