दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार ;राजकुमार बडोले यांची नाशकात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:59 PM2018-09-24T17:59:33+5:302018-09-24T18:02:10+5:30

यापूर्वी एक व्यक्ती आणि एक संस्थेला दिला जाणारा संत रविदास पुरस्कार सध्या ५ व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) नाशिकमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारीत धड्याचाही पुन्हा अभ्यास क्रमात समावेश करण्यात येणार असून प्रत्येक विभागात संत रविदास भवनाच्या कामाला यावर्षिच सुरुवात होणार असल्याचे राकुमार बडोले यांनी सांगितले. 

Ten individuals, five organizations will get the Sant Ravidas award; Rakumar Badole's announcement in Nashik | दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार ;राजकुमार बडोले यांची नाशकात घोषणा

दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार ;राजकुमार बडोले यांची नाशकात घोषणा

Next
ठळक मुद्दे१० व्यक्ती आणि पाच संस्थांना संत रविदास पुरस्कारसामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणानाशिकमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापनदिन उत्साहात

नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एक संस्थेला  दिला जाणारा संत रविदास पुरस्कार सध्या ५ व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) नाशिकमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारीत धड्याचाही पुन्हा अभ्यास क्रमात समावेश करण्यात येणार असून प्रत्येक विभागात संत रविदास भवनाच्या कामाला यावर्षिच सुरुवात होणार असल्याचे राकुमार बडोले यांनी सांगितले. 
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संस्थेच्या २४ वर्धापन दिनासोबतच माजी मंत्री बबन घोलप यांच्या कला व राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्यसाधून ‘त्रिवेणी संगम’ सोहळ््याच्या माध्यमातून  सोमवारी बबन घोलप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सूर्याचार्य कृष्णदेवनंदगीरी महाराज, आमदार भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र अवसारे, सीमा हिरे , योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदि उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, जाती धर्माच्या नावावर उपेक्षित घटकांवर अन्याय होत असताना तळागाळाती वंचित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंनी घटनेच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपले मूलभूत हक्के प्राप्त केले पाहिजे. त्यासाठी सरकार नियमित वंचितांच्या पाठीश्ी आहे. दरम्यान, सत्कारा उत्तर देताना बबन घोलप यांनी अन्य महामंडळांच्या तुलनेत रविदास महामंडळावर अन्याय होत असल्याचे सांगत इतर महामंडळांप्रमाणेच रविदास महामंडळाच्या लाभांर्थ्यांनाही सोयी सुविधाव  योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली, तर आमदार योगेश घालप बबन घोलप यांना राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना  भावना अनावर झाल्याचे दिसून आले. प्रास्ताविक दत्तात्र गोतीसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शंताराम कारंडे यांनी केले.

चर्मकार आयोसाठी पाठपुरावा 
राजात चर्मकार आयोग स्थापन करण्यास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाला परवानगी राज्याची मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच केंद्र व राज्य चर्मकार आयोग स्थापन करण्याचे आश्वासन राजकुमार बडोले यांनी दिले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्यात बाबू जगजीवन राम यांच्या नावाने हा अयोग स्थापन करण्याची मागणी राष्ट्राय चर्मकार महासंघाडून करण्यात येत आहे. 

कांबळे यांचे बडोलेंवर स्तुती सुमने
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होत असताना काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेचे उपनेते तथा माजीमंत्री बबन घोलप यांच्यासत्करा सोहळ््यात भाजपाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्याविषयी स्तुती सुमने उधळतानाच राज्यात बडोले यांचे काम खुप चांगले असल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकले.त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचवल्या असून आगामी काळात अहमदनगरच्या राजकारणारणात मोठे बदल पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Web Title: Ten individuals, five organizations will get the Sant Ravidas award; Rakumar Badole's announcement in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.