चौघांना धडक देऊन टेम्पो उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:54 AM2018-11-14T00:54:26+5:302018-11-14T00:54:40+5:30

सिन्नर शहरातील शिंपीगल्लीत मालवाहू छोटा हत्ती उलटून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले.

The Tempo overturned and hit the four | चौघांना धडक देऊन टेम्पो उलटला

चौघांना धडक देऊन टेम्पो उलटला

Next

सिन्नर : शहरातील शिंपीगल्लीत मालवाहू छोटा हत्ती उलटून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. ही घटना सोमवारी दि.१२ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. मद्याच्या नशेत तर्रर्रर्र असणारा चालक रस्ता चुकल्याने थेट शहरात गंगा वेशीकडून भिकुसा कॉर्नरकडे जाणारा मालवाहू छोटा हत्ती शिंपी गल्लीत घुसल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना जखमी करून या वाहनाने बीएसएनएलच्या व महावितरणच्या खांबाला धडक दिली. माळेगाव एमआयडीसीत एका कारखान्यातून माल भरून हे वाहन घेऊन संतोष शिवाजी काटे (रा.रविवार कारंजा, नाशिक) नाशिकच्या दिशेने जायला निघाला होता. मद्याचा नशेत असल्याने तो रस्ता भरकटला आणि नायगाव रस्त्याने गंगा वेशीतून थेट भिकुसा कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावरून शहरात घुसला. काहीशा वेगाने येणाºया या वाहनाने उभ्या असलेल्या एका बुलेटधारकाला धडक दिली. पुढे शिंपी गल्लीत आल्यानंतर दुकानाबाहेर गप्पा मारत उभ्या असलेल्या श्याम अवसरकर या व्यवसायिकासह यादव लोणारे व रस्त्याने
जाणाºया आणखी दोघांना जखमी करत गल्लीच्या कॉर्नरवर असलेल्या खांबावर जाऊन धडकला.

Web Title: The Tempo overturned and hit the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.