शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 08:52 PM2020-10-08T20:52:26+5:302020-10-09T01:04:58+5:30

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी, गरीब व होतकरू परंतु शिक्षण सुविधापासून वंचित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून अभ्यासाविषयी ...

Teachers 'footsteps, tribal students' doors | शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी

शिक्षकांची पायीवारी,आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारी

Next
ठळक मुद्देपाताळेश्वर माध्यमिक विद्यालय: वाडी-वस्त्यांवर जाऊन आॅनलाईन शिक्षणाचे धडे

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आदिवासी, गरीब व होतकरू परंतु शिक्षण सुविधापासून वंचित विद्यार्थ्यांशी हितगुज साधून अभ्यासाविषयी माहिती जाणून घेतली.

टोळेवस्ती येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. कोरोना महामारीच्या संकाटात शासनाने राबविलेला उपक्रम शाळा बंद पण शिक्षण चालू व तो भ्रमणध्वनी (मोबाईल) या साधनाच्या माध्यमातून परंतु या आदिवासी डोंगराळ भागात डोंगर कपारीत राहणा?्या पालकांकडे मोबाईलसारखी साधने नाही. स्वत: शिक्षणापासून खूप दूर म्हणून आर.टी.गिरी व एस.एम. कोटकर यांनी या वस्तीत घरोघरी जाऊन त्या पालकांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.

आपण या महामारीशी सामना करतांना सर्व नियमाचे पालन करून आरोग्य सदृढ राखत अभ्यासापासून दूर न जाता जवळीक साधण्यासाठी विद्यार्थ्यांची भेट घेतली. गणितातील सोप्या संकल्पना विदद्यार्थ्यांना सांगून गणिताचा आपल्या जीवनाशी
सहसंबध व गणित पेटीतील साहित्याची ओळख करून दैनदिन जीवनातील गणिते समजावले.


पालकांच्या उपलब्ध शैक्षणिक साधनाचा उपयोग करून शिक्षकांनी पाठविलेला अभ्यास नियमित बघून तो पालकांच्या मदतीने समजून घ्यावा व शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या अभ्यास संदर्भीय अडचणी सोडवून घ्यावा यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केले. कोटकर यांनी विद्यार्थ्यांना आपण राहत असलेल्या भौगोलीक रचनाची माहिती सांगितले या परिसरातील भौगोलिक घटकांनी ओळख व
त्यांचे उपयोग सांगितले कोरोना या रोगाची भयानकता कमी होण्या ऐवजी ती अधिक वाढत आहे व त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेणे दुरापास्त होत आहे.परंतु आपण मात्र वेगवेगळा माध्यमाव्दारे शिक्षणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी विदयार्थी योगेश बस्तीराम मेंगाळ,सोमनाथ पांडुरंग पथवे,कुमारी अनिता हौशीराम मेंगाळ, योगेश श्रावण खडके, अनिल पंढरी मधे, यश विठ्ठल पथवे, अक्षय भाऊराव मेंगाळ व त्याचे पालक श्री बस्तीराम मेंगाळ, सखाराम गांवडे,  हौशीराम मेंगाळ यांनी आपले मनोगत सांगितले.

 यावेळी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, उपशिक्षक आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एम. सी. शिंगोटे,एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे,सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे,आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे यांनी सहकार्य केले. 

 

Web Title: Teachers 'footsteps, tribal students' doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.