तात्या टोपे स्मारक अखेर बाभूळगावीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:20 PM2018-11-19T17:20:58+5:302018-11-19T17:21:52+5:30

प्रशासकीय मान्यता : जागेवरुन वाद पेटण्याची शक्यता

Tantia Tope memorial will finally be Babe! | तात्या टोपे स्मारक अखेर बाभूळगावीच!

तात्या टोपे स्मारक अखेर बाभूळगावीच!

Next
ठळक मुद्देतात्या टोपे यांच्या स्मारकासाठी येवला नगरपरिषदेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्चित करून तसा ठरावही केला आहे. 

येवला : येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या १० कोटी ९२ लक्ष रुपयांच्या निधीसह आराखड्यास राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने स्मारकाच्या कामाला चालना मिळणार आहे. मात्र, सदर स्मारक हे नगरपरिषदेच्या हद्दीतील बाभूळगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर ४९ व ५० च्या जागेवरच बांधण्याचा स्पष्ट उल्लेख शासननिर्णयात असल्याने जागेवरुन वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या २०० व्या स्मृतीनिमित्त येवला येथे स्मारक बांधण्यासाठी त्यांचा ७५ टक्के म्हणजे ७ कोटी ८८ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य शासनाचा १५ टक्के म्हणजे १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये हिस्सा असणार असून उर्वरित १० टक्के खर्च म्हणजे १ कोटी ४६ लाख ७९ हजार रुपये येवला नगरपरिषदेला करावा लागणार आहे. शासनाने सदर १० कोटी ९२ लाख २९ हजार रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास काही अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता दिली असून तसा आदेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सोमवारी (दि.१९) निर्गमित केला आहे. शासनाने आदेश काढताना मात्र, सदर स्मारक हे येवला नगरपरिषदच्या हद्दीतील बाभूळगाव खुर्द शिवारातील सर्व्हे नंबर ४९ आणि ५० याठिकाणी बांधण्यास मान्यता दिलेली आहे. शासनाने गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या स्मारकाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रत्यक्ष कामास चालना मिळणार असली तरी जागेवरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी येवला नगरपरिषदेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्चित करून तसा ठरावही केला आहे. 

Web Title: Tantia Tope memorial will finally be Babe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक