सात महिन्यांपासून फरारसाबळे खुनातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:53 AM2018-01-11T00:53:19+5:302018-01-11T00:54:08+5:30

नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसारा येथील निष्पाप तुषार साबळे या तरुणाच्या खुनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़

Suspected suspects arrested for seven months |  सात महिन्यांपासून फरारसाबळे खुनातील संशयितास अटक

 सात महिन्यांपासून फरारसाबळे खुनातील संशयितास अटक

Next
ठळक मुद्दे शहर गुन्हे शाखेची कामगिरीमुंबईतील चेंबूर परिसरातून अटक

नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसारा येथील निष्पाप तुषार साबळे या तरुणाच्या खुनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़
पंचवटी-पेठरोड परिसरातील सराईत गुन्हेगार किरण राहुल निकम याचा भाजीपाला व्यवसायाच्या वादातून गतवर्षी १९ मे रोजी संशयित संतोष उघडे, संतोष पगारे, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़ या खुनाचा सूड घेण्यासाठी मयत किरणचा भाऊ शेखर निकम याने बंडू मुर्तडकच्या खुनाचा कट रचला होता़ त्यानुसार २५ मे २०१७ रोजी बंडू मुर्तडक हा उपनगर परिसरातील मंगलमूर्तीनगरमधील हर्ष अपार्टमेंटमध्ये आल्याची माहिती मिळाल्याने शेखर निकम व त्याचे सात-आठ साथीदार दुपारी चार वाजेच्या सुमारास ओम्नी, अल्टो व इंडिगो कारमधून पोहोचले़ त्यांनी बंडू मुर्तडक समजून त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेला कसारा येथील तुषार भास्कर साबळे या युवकावर गोळीबार तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला व फरार झाले़
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, पोलीस शिपाई विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, राहुल पालखेडे, दीपक जठार यांनी शिताफीने चेंबूर येथून अटक केली़ गुन्हे शाखेने संशयित पवार यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ पोलिसांनी शेखर निकम व त्याच्या साथीदारांना औरंगाबादमधून अटक केली़ मात्र, साबळेच्या खुनातील संशयित शिवम ऊर्फ शुभम सुरेश पवार (रा़ महालक्ष्मी चाळ, वाल्मीक मंदिराच्या मागे, द्वारका, नाशिक) हा तेव्हापासून फरार झाला होता़ गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना फरार पवार हा म्हाडा वसाहत, माहुल गाव, चेंबूर, मुंबई येथे असलयाची माहिती मिळाली होती़

Web Title: Suspected suspects arrested for seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा