‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:13 AM2019-07-23T00:13:31+5:302019-07-23T00:14:01+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२२) दुपारी बारा वाजता उघडकीस आला.

 Strictly prohibited alcohol traffic from 'Red Cross' | ‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक

‘लालपरी‘मधून चक्क प्रतिबंधित मद्य वाहतूक

Next

नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद मिरविणाऱ्या राज्य महामंडळाच्या चाळीसगाव आगाराच्या एका ‘लालपरी’मधून चक्क राज्यात विक्रीवर निर्बंध असलेला परराज्यात निर्मित मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२२) दुपारी बारा वाजता उघडकीस आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून बसमधून (एम.एच. ४० एन. ९८१७) दादरा-नगर हवेलीमध्ये निर्मित मद्याच्या दहा बाटल्या जप्त केल्या. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक दक्षता सुरक्षा विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन विभाग, नाशिकच्या पथकाने विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष चोपडेकर, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सापळा रचला. दुपारी बसस्थानकात चाळीसगाव-सिल्वासा (नाशिकमार्गे) ही बस दाखल झाली. पथकाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता पथकाचे प्रमुख अजित भारती यांना सोबत घेऊन या बसची झाडाझडती घेतली. दरम्यान, कर्मचाºयांनी बसच्या रा.प. कर्मचाºयांकरिता राखीव असलेल्या चालकाच्या पाठीमागील रांगेतील ३५-३६ क्रमांकाच्या बाकाखालून एका पोत्यात भरलेल्या प्रतिबंधित मद्याच्या बाटल्या हस्तगत केल्या. तसेच चालकाच्या कॅबीनमध्ये असलेली एक कुलूपबंद पेटी तपासणीसाठी वाहकाकडून किल्ली घेऊन उघडली असता त्यामध्ये त्याच प्रकारच्या दोन मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. सुमारे २ हजार ९९० रुपयांचा मद्य जप्त केले. संशयावरून चालक राकेश पाटील (रा.पातोंडा, ता.चाळीसगाव), वाहक मनोज महाजन (रा.मेहुणबारे) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
परराज्यांमध्ये ये-जा करणाºया बसेस ‘रडार’वर
गुजरात राज्यातील सिल्वासा, केंद्र शासित प्रदेश दीव-दमण, दादरा-नगर हवेली या शहरांमध्ये ये-जा करणाºया ‘एम.एस.आर.टी.सी’, ‘जी.एस.आर.टी.सी’च्या बसेसची तपासणी भरारी पथकाकडून अचानकपणे केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. या बसेस आता रडारवर असून, बसेसमधून अवैधरीत्या मद्यवाहतूक होऊ नये, यसााठी भरारी पथकांना विशेष सूचना राजपूत यांनी दिल्या आहेत.

Web Title:  Strictly prohibited alcohol traffic from 'Red Cross'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.