भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:55 AM2018-01-05T00:55:04+5:302018-01-05T00:55:16+5:30

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Stop the Ghant Garbage for sale of scrapers | भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Next

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी महामार्गास दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटत होते. परंतु समांतर रस्त्यालगतच असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांमुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, परंतु याच समांतर रस्त्यावरून शहरातील विविध प्रभागांतून केरकचरा गोळा करून घंटागाड्या खतप्रकल्प जातात. त्यावेळी घंटागाड्यात गोळा झालेला भंगारमाल विक्र ीसाठी समांतर रस्त्यावरच भगतसिंग वसाहतीत असलेल्या भंगार विक्र ीच्या दुकानात विकतात. त्यासाठी तासन्तास घंटागाड्या उभ्या राहतात. मार्गक्रमण करणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यामुळे लहान-मोठे अपघातही घडत आहेत. महापालिका अतिक्र मण विभागाने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम उभारली आहे, परंतु त्यांना समांतर रस्त्यावरील भंगार विक्रीची दुकाने दिसत नाही का असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.

Web Title: Stop the Ghant Garbage for sale of scrapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक