राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : कल्पनाशक्तीचे ‘उडान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:31 AM2018-12-22T00:31:07+5:302018-12-22T00:32:09+5:30

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी के. के. वाघ तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात १२५ विज्ञान प्रकल्पांची मांडणी करण्यात आली आहे.

 State-level science exhibit: 'Flying' of imagination | राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : कल्पनाशक्तीचे ‘उडान’

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन : कल्पनाशक्तीचे ‘उडान’

googlenewsNext

नाशिक : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी के. के. वाघ तंत्रनिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात १२५ विज्ञान प्रकल्पांची मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.  नाशिक शहर परिसर तसेच राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांचे संशोधन या विज्ञान प्रदर्शनात मांडले आहेत. सुमारे शंभर शाळांमधील ३७५ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात मांडले आहे. आधुनिकतेबरोबरच परंपरागत साधनांचा वापर आजच्या युगातही किती उपयुक्त ठरू शकतो या विषयाला अनुसरून लहान-मोठे प्रकल्प या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडले आहे.
इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते बारावी असे विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले होते. या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र विज्ञान विषय देण्यात आले होते. यामध्ये हसत खेळत विज्ञानाबरोबरच हरित तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले.
विशेषत: नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून त्यांचा उपयोग करणे, इंधनाची बचत तसेच टाकाळपासून टिकाऊ या विषयांवर जास्त भर देण्यात आला. ऊर्जा आणि जलसंवर्धनावार सर्वाधिक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
अ‍ॅँग्लो ऊर्द हायस्कूल, नाशिकरोड
४ औष्णिक वीजनिर्मिती प्रकलपातून निर्माण होणारी वीज ही अत्यंत महत्त्वाची आहे. पाण्याच्या सह्याने टर्बाइन फिरवून कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. यासाठी वापरण्यात येणाºया पाण्याचे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन झालेले पाणी पुन्हा कुलिंग टॉवरमध्ये साठवून त्याचा पुनर्वापर करण्याचा हा प्रकल्प नाशिकरोडच्या अ‍ॅग्लो ऊर्द हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. ओैष्णिक वीजनिर्मितीसाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची ही कल्पना मांडण्यात आली आहे. टॉवरमधील बाष्प अन्य टॉवरमध्ये जमा करून त्याचे पाण्यात रूपांतर करून सदर पाणी पुन्हा प्रकल्पात वापरण्यात येऊ शकते, असा प्रकल्प सादर करण्यात आला. शहा मसिरा रमझान, मुस्कान मणियार, कौसर सय्यद झेबा, सय्यद अलिशा साजिदअली या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला. प्रकल्प मार्गदर्शक म्हणून शिक्षिका उझमा खान यांचे मार्गदर्शन लाभले.
धामणगाव माध्यमिक विद्यालयाचे
‘बॉटल ट्री गार्ड’
टाकाऊ आणि दैनंदिन वस्तुंचा वापर करून झाडे जगविण्यासांठी ‘बॉटल ट्री गार्ड ’ हा अभिनव प्रयोग धामणगाव येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व बांबूंच्या साह्याने ट्री गार्ड तयार करण्यात आले असून, यासाठी ७२ प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आलेला आहे. ‘जास्त दाबाकडून कमी दाबाकडे’ या पास्कलच्या सिद्धांतानुसार हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यातील ७२ बाटल्यांचा असा वापर करण्यात आला आहे की एका बाटलीत पाणी टाकले, तर ७२ बाटल्या भरल्या जातात तरीही ठिबक सिंचननुसार झाला दिवसभरात एक लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. शाळा महिनाभर बंद असणाºया काळात शाळा आवारातील झाडांना ‘बॉटल ट्री गार्ड’ वापरला तर झाडे सहज जगू शकतात. ओमकार वाघचौरे, संकेत क्षीरसागर, शुभम वाघमारे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला. त्यांना शिक्षक नितीन इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कचºयाचे विलगीकरण आणि उपयुक्तता
कचºयाचे दुहेरी फायदे पंचवटीतील के.के वाघ सेकंडरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले आहेत. त्यांनी अशाप्रकारचे मशीन तयार केले आहे की ज्यामध्ये कचरा टाकल्यानंतर त्यातून कागदाचे विलगीकरण केले जाऊ शकते. या कागदाचा पुर्नवापर केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदुषणाला आळा बसणार असून कागदाचा पुर्नवापर देखील होणार आहे. तर उर्वरित कचºयापासून नैसर्गिक खत तयार होऊन त्या खताचा वापर शेतीसाठी होऊ शकतो. कचरा किलर मशीन असे नाव त्यांनी आपल्या यंत्राला दिलेले आहे. वैयक्तिक घर आणि कॉलनी, सोसायटी परिसरात अशा प्रकारचा प्रयोग केल्यास कचºयापासून खत र्नििर्मती आणि कागदाचा पर्नवापर होऊ शकतो असे या प्रयोगातून सादर करण्यात आले आहे. मनिषा पाटोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सादरीकर विश्वेश पावरा, संस्कार गटकळ, प्रज्वल पाटील आणि रोहीत नाईक यांन केले आहे.
अतंत्य कमी खर्चात आणि सोप्या अशा यंत्राच्या साह्याने कचºयाचे विलगीकरण करून बहुविध उपयोग करता येऊ शकतात असे या प्रयोगातून दाखविण्यात आले.
रचना विद्यालय, कर्णबधिर
‘पावसाचे पाणी आणि वीजनिर्मिती’
गाव, खेड्यावर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असते. दुष्काळाच्या काळात तर गावागावात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्याची संकल्पना रचना विद्यालयाच्या कर्णबधिर शाखेने मांडला आहे. पावसाचे पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ते पाणीपाइपाच्या साह्याने गतीने टर्बाइनवर पडेल आणि टर्बाइन फिरून त्यापासून वीजनिर्मिती करता येऊ शकेल, असा प्रयोग सादर करण्यात आला. वरून पडणाºया पाण्याच्या साह्याने वीजनिर्मिती करण्याबरोबरच टर्बाइनमधील पाणी शेतीसाठीदेखील कुलिंग करून वापरता येऊ शकते त्यामुळे दहेरी लाभाचा हा प्रयोग शेतीसाठी उपयुक्त असल्याचे दाखविण्यात आले आहे. लौकिक मगर, मयूर येवला यांनी सादर केला. प्रकल्प मार्गदर्शक म्हणून नीता घरत यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  State-level science exhibit: 'Flying' of imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.