जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:44 PM2019-06-18T17:44:28+5:302019-06-18T17:44:52+5:30

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे.

Start of Jalakbha Cleanliness Campaign in the district | जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता अभियानास सुरुवात

जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता अभियानास सुरुवात

Next
ठळक मुद्देअंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येत असून, ३० जूनपर्यंत चालणा-या या अभियानात आतापर्यंत जिल्ह्यातील पेठ, निफाड, बागलाण व सिन्नर येथे मोठ्या प्रमाणात जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली.


ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.एल. नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने मागील वर्षापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला दोन दिवस देण्यात आले असून आतापर्यंत पेठ व निफाड तालुक्यात अभियान पूर्ण झाले आहे. सिन्नर व बागलाण तालुक्यात अभियानास सुरुवात झाली असून ३० जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सदरचे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत वापरात येणाºया पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यांची स्वच्छता करणे व ज्या स्रोतांचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहायक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान प्रभावीपणे राबविणेबाबतचे आदेश दिले असून, याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.

Web Title: Start of Jalakbha Cleanliness Campaign in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.