कर्मचारी अपघातप्रकरणी तारांकित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:49 AM2019-05-30T00:49:26+5:302019-05-30T00:50:03+5:30

बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 Starred question about employee accidents | कर्मचारी अपघातप्रकरणी तारांकित प्रश्न

कर्मचारी अपघातप्रकरणी तारांकित प्रश्न

Next

नाशिक : बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी असा कोणताही प्रकार घडलाच नव्हता, अशी भूमिका घेणाºया अधिकाºयांवर आता उत्तर देण्याची वेळ आली आहे.
ब्रेकडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक कर्मचाºयाला पाठवून बस दुरुस्त करणे अपेक्षित असताना डेपोतील प्रभारी अधिकाºयाने साळुंके नामक अतांत्रिक कर्मचाºयाला बस दुरुस्तीसाठी पाठविले आणि बसचे काम करीत असताना दोन बसच्या मध्ये सापडून सदर कर्मचारी गंभीर जखमी झाला. या प्रकरणाबाबत महामंडळातील सर्वच अधिकाºयांनी गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबाबतची कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याची चर्चादेखील आहे. आता मात्र राज्यातील पाच आमदारांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे या घटनेतील गांभीर्य वाढले आहेच, शिवाय मनमानी करणाºया डेपोतील कथित अधिकाºयाचे प्रतापही यानिमित्ताने चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर घटना १५ एप्रिल रोजी जुने सीबीएस येथे घडली होती. या संदर्भात लोकमतने १९ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्धदेखील केले होते. असे असतानाही अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती. संबंधित कर्मचाºयाला तातडीने सुट्टी मंजूर करून त्यास घरी पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर पंधरा दिवसांत मंडळातील अधिकाºयांनी कुणाचीही चौकशी केली नाही की कुणावर ठपकादेखील ठेवला नसल्याने प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र आता थेट वाहतूक महाव्यवस्थापकांच्या स्वाक्षरीनेच घटनेबाबतचा खुलासा मागविण्यात आल्याने अधिकारी चांगलेच हबकले आहेत.
अशी घडली होती घटना
गेल्या १५ एप्रिल रोजी जुने सीबीएस बसस्थानकात एमएच१४/बीटी ०७०९ ही बस नादुरुस्त झाली होती. सदर बस डेपोत घेऊन येण्यासाठी डेपोतून एमएच४०/६२२७ ही बस पाठविण्यात आली. नादुरुस्त बस दुरुस्त करण्यासाठी डेपो क्ऱ १ मधील प्रभारी कारागिराने अतांत्रिक कारागीर ज्याला बस दुरुस्तीचा कोणताही अनुभव नाही अशा कर्मचाºयाला पाठविले. या ठिकाणी बस दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन्ही बसच्या मध्ये संबंधित अतांत्रिक कर्मचारी सापडल्याने तो जखमी झाला. या प्रकरणाची कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती. यावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता़
जखमी कर्मचाºयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न
४विधानमंडळाकडून विचारणा झाल्यानंतर नाशिक डेपोतील काही अधिकाºयांनी जखमी अतांत्रिक कर्मचारी साळुंखे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आज दिवसभर डेपोत सुरू होती. अधिकाºयांची कोणतीही चूक नसल्याचे लेखी संबंधित कर्मचाºयाकडून लिहून घेण्यासाठीचे अनेक प्रयत्न डेपोतील वरिष्ठांनी केले. या प्रकरणी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाºया पुढाºयांनादेखील मध्यस्थी करण्यात आले. मात्र जखमी कर्मचारी ठाम राहिल्याने अधिकारीही हतबल झाले.
‘त्या’ प्रभारी कारागिराकडून ‘डिनर’
४अतांत्रिक कर्मचाºयाच्या अपघात प्रकरणाचा प्रश्न विधिमंडळात गेल्यानंतर नाशिक डेपो क्रमांक १ मध्ये खळबळ उडाली. डेपोस्तरावर काम करणाºया अधिकाºयांनी काही राजकीय पुढाºयांशी संपर्क साधून सदर प्रकरणे मिटविण्यासाठी खलबते सुरू केल्याचे वृत्त आहे़ त्यासाठी डेपो आणि विभागीय कार्यालयातील काही कर्मचाºयांसाठी गंगापूररोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणावळीचा घाट घालण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title:  Starred question about employee accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.