शिक्षकांना विशेष रजा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 09:44 PM2020-03-05T21:44:26+5:302020-03-05T21:46:38+5:30

सिन्नर : प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन अलिबाग येथे १३ मार्च रोजी होत आहे. राज्यातील प्रबळ असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना आँनड्युटी दिनांक ९ ते १४ मार्च अखेर सहा दिवसाची विशेष रजा मंजुर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली

Special leave granted to teachers | शिक्षकांना विशेष रजा मंजूर

शिक्षकांना विशेष रजा मंजूर

Next
ठळक मुद्देअलिबाग अधिवेशन : प्राथमिक शिक्षकांसाठी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन अलिबाग येथे १३ मार्च रोजी होत आहे. राज्यातील प्रबळ असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना आँनड्युटी दिनांक ९ ते १४ मार्च अखेर सहा दिवसाची विशेष रजा मंजुर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली
अलिबागच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अलिबाग येथील नागोठणे येथील रिलायन्स मैदानावर हा कार्यक्र म होणार आहे. उदघाटनउदधव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून राष्टÑवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. जुनी पेंशन योजना, मुख्यालय अट रदद करणे, प्राथमिक शिक्षक यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे,वस्तीशाळा शिक्षक यांच्या सेवा सलग धरणे,शाळांना मोफत वीज पुरवठा,बीएलओ कामातून शिक्षक यांना वगळणे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे
या अधिवेशनासाठी राज्य शासनाने तीन दिवसाऐवजी ९ मार्च ते १४ मार्च अशी सहा दिवसाची रजा मंजूर केल्याबाबतचे परिपञक ग्रामविकास मंञालयाने काढल्याचे संघाचे राज्यसंघटक मिलिंद गांगुर्डे , सोमनाथ तेल्हुरे यांनी सांगितले.

Web Title: Special leave granted to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.