वडांगळीत साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 04:23 PM2018-01-10T16:23:10+5:302018-01-10T16:23:45+5:30

सिन्नर : सततचे भारनियमन व पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात कष्ट करणे, त्यात जीवघेणी थंडी व बिबट्याची भीती यांपासून शेतकºयांची सुटका करून त्यांना दिवसाच अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे १२ तास वीज मिळणार आहे.

Solar Power Project to be built in Vadnali | वडांगळीत साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

वडांगळीत साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

Next

सिन्नर : सततचे भारनियमन व पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात कष्ट करणे, त्यात जीवघेणी थंडी व बिबट्याची भीती यांपासून शेतकºयांची सुटका करून त्यांना दिवसाच अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे १२ तास वीज मिळणार आहे. वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे पुरेशी वीज मिळण्यासाठी सरपंच सुनीता सैद व उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी २९ डिसेंबर २०१६ रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली होती. इतर राज्यांप्रमाणे सौर ऊर्जा प्रकल्पाची पथदर्शी योजना गावात राबविण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. तथापि, शासनाचे सौरऊर्जेचे धोरण ठरविण्यात येत असून धोरण नक्की होताच वडांगळीच्या प्रकल्पाबाबत विचार करण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले. त्यानंतर शासनाने १४ जून २०१७ रोजी मुख्यमंत्री सौर कृषी योजना जाहीर करताच ग्रामपंचायतने पुन्हा १६ जून २०१७ रोजी ऊर्जा विभागाला गावातील शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबविण्याची मागणी केली. त्यानंतर उपसरपंच नानासाहेब खुळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, पोपट सैद आदींनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन हा प्रकल्प प्राधान्याने राबवविण्याची मागणी केली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेला (मेडा) कार्यवाहीचे आदेश दिल. त्यानुसार ३० जून २०१७ रोजी मेडाने नाशिक येथील अधिकाºयांना या योजनेची उपयोगिता तपासण्यास सांगितले. वडांगळी येथे येवून त्यांनी योजनेची उपयोगिता तपासून तसा अहवाल मेडाकडे पाठविण्यास सांगितले. वडांगळी येथे वीजउपकेंद्रालगत जागा असल्याने व व शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने महाजनकोने वडांगळी उपकेंद्रालगत सौर वीज प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे देवपूर शिवारातही खासगी व्यक्तीमार्फत २ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प साकारत आहे.
जागा मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरु होणार..
वडांगळी ग्रामपंचायत हद्दीतील जागा मिळण्यासाठी महाजनकोने महसूल विभागाला प्रस्ताव दाखल केला असून वडांगळी शिवारात फिरणाºया वीजवाहिन्यांना एका वेळी आवश्यक असणाºया ५ मेगावॅटविजेच्या प्रकल्पासाठी १० हेक्टर जागेची आवश्यकता असून ही जागा ३० वर्षे भाडे कराराराने महाजनकोला दिली जाणार आहे. महाजनको निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपनी मार्फत हा प्रकल्प साकारणार आहे.
वडांगळीच्या शेतकºयांना फायदा ..
वडांगळी ग्रामपंचायतच्या वतीने या प्रकल्पासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. प्रकल्पातून तयार होणारी वीज वडांगळीच्या प्रत्येक शेतकºयाला प्राधान्याने दिवसा वीज देण्यात यावी व उर्वरित वीज शेजारील गावातील शेतकºयांना देण्याच्या अटीवरच हा प्रकल्प होत आहे. त्यामुळे वडांगळी व कोमलवाडी फीडरवरील शेतकºयांना सर्वात अगोदर या प्रकल्पातून वीज मिळणार आहे.

Web Title: Solar Power Project to be built in Vadnali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक