वादळामुळे शिमला मिरची जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:49 PM2018-05-16T15:49:06+5:302018-05-16T15:49:06+5:30

औंदाणे : येथील शेतकरी तुषार खैरनार यांच्या अर्धा एकर शिमला मिरचीचे अचानक भवरी वादळामुळे शेडनेट जाळी उडाल्याने अतोनात नुकसान झाले.

Shimla chilli land grab due to the storm | वादळामुळे शिमला मिरची जमिनदोस्त

वादळामुळे शिमला मिरची जमिनदोस्त

Next

औंदाणे : येथील शेतकरी तुषार खैरनार यांच्या अर्धा एकर शिमला मिरचीचे अचानक भवरी वादळामुळे शेडनेट जाळी उडाल्याने अतोनात नुकसान झाले. येथील शेतकरी खैरनार यांनी ऐन उन्हाळयात पाणी टंचाई असताना ही अर्धा एकर शिमला मिरचीची लागवड केली व उन्हापासुन हया मिरचीला संरक्षण म्हणुन शेडनेट जाळीची गरज असते. अन्यथा सावलीविना हे पिक घेता येत नाही. या अर्धा एकरवर शेडनेट जाळी टाकली व फवारनी,म् ाजुरी, औषधे असा एक लाख पंचवीस हजार रु पये खर्च केला. बाजारात तयार झालेल्या या मिरचीचे भवरी वादळामुळे शेडनेट जाळीसह, मिरचीचे अतोनात नुकसान झाल. शेतात तयार झालेला घास हिरावून नेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. सध्या भाजीपाला पिकाला बाजारात भाव नसल्याने अपेक्षेपोटी भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी पिकांची लागवड करतो, परंतु अचानक झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन उन्हाळयात पाणी टंचाईला तोंड देत शिमला मिरचीची अर्धाएकर लागवड केली व मिरची तयार होईपर्यत सुमारे १ लाख २५ हजार खर्च केला परंतु तयार झालेला माल नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला.

Web Title: Shimla chilli land grab due to the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक