सात वनकर्मचाºयांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:12 AM2017-10-19T00:12:45+5:302017-10-19T00:12:51+5:30

‘खैर’ जंगलतोड : मालेगाव उपवनविभागाच्या अधिकाºयांचा समावेश नाशिक : मालेगाव उपवनविभागातील ९० हेक्टरवरील जंगलात ‘खैर’चे पाचशेहून अधिक वृक्ष कापून त्यांच्या बुंध्यांवर माती टाकून बुजविण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सात वन कर्मचाºयांची कार्यालयीन चौकशी सुरू झाली आहे.

 Seven cases related inquiries | सात वनकर्मचाºयांची चौकशी सुरू

सात वनकर्मचाºयांची चौकशी सुरू

Next

‘खैर’ जंगलतोड : मालेगाव उपवनविभागाच्या अधिकाºयांचा समावेश

नाशिक : मालेगाव उपवनविभागातील ९० हेक्टरवरील जंगलात ‘खैर’चे पाचशेहून अधिक वृक्ष कापून त्यांच्या बुंध्यांवर माती टाकून बुजविण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सात वन कर्मचाºयांची कार्यालयीन चौकशी सुरू झाली आहे.
महाराष्टÑ-गुजरात सीमेवरील नाशिकच्या आदिवासी भागातील जंगलात धुमाकूळ घालणाºया खैर तस्करांच्या टोळीचे हात थेट मालेगावच्या वनहद्दीपर्यंत पोहचल्याने धोका वाढला आहे. वनविभागापुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान अद्यापही कायम आहे. मालेगाव उपवनविभाग हे स्वतंत्र कार्यक्षेत्र असून, मुख्य वनसंरक्षकांचे नियंत्रण असलेल्या या उपवन विभागात मागील चार महिन्यांपासून सातत्याने खैरची तोड करणारी टोळी सक्रिय झाल्याचे उघडकीस आले होते. या टोळीकडून सुमारे पाचशेहून अधिक खैर झाडांची तोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’च्या वृत्ताने उघडकीस आला. यानंतर सातत्याने या प्रकाराचा पाठपुरावा सुरू ठेवला. रामाराव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत स्वतंत्र पथकामार्फत पंचनाम्याचे आदेश दिले होते. तसेच जंगलाची पाहणी करून वृक्षतोडबाबत झालेला अधिकारी-कर्मचाºयांचा दुर्लक्षितपणाही त्यांनी शोधला. त्यानंतर सात वनकर्मचारी-अधिकारी यांच्यावर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. या वनकर्मचाºयांची शासकीय स्तरावरून कार्यालयीन चौकशी सुरू झाली आहे. मालेगाव उपवनविभागाच्या जंगलात कापलेल्या खैरच्या वृक्षांचा साठा व त्यामागे असणाºया गुन्हेगारांचा शोध युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. तस्करांच्या ‘लिंक’ तपासल्या जात असल्याचे रामाराव यांनी सांगितले.
तस्करांची पाळेमुळे उद्ध्वस्त करणार
मालेगावसह सुरगाणा, पेठ तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीमधील जंगलात घुसखोरी करून खैर कापणाºयांची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्यासाठी वनविभागाने ‘अ‍ॅक्शन प्लान’ तयार केला आहे. या अंतर्गत स्वतंत्र दोन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. नाशिकचे मोबाइल दक्षता पथकासह मालेगाव उपवनविभागातही एक पथक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पूर्व-पश्चिम वनविभागालादेखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पेठ, सुरगाणा वन परिक्षेत्रातील जंगलात होणारी खैर तस्करांची घुसखोरी रोखण्याचा टास्क रामाराव यांनी दिला आहे.

११आॅक्टो. मुख्यपान-९वरील ‘दक्षता पथकातर्फे खैर तोडीची चौकशी’ बातमीचा कोलाज वापरणे. तस्करांची पाळेमुळे उद्ध्वस्त करणार
मालेगावसह सुरगाणा, पेठ तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीमधील जंगलात खैर कापणाºयांची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्यासाठी वनविभागाने ‘अ‍ॅक्शन प्लान’ तयार केला आहे. नाशिकचे मोबाइल दक्षता पथकासह मालेगाव उपवनविभागातही पथक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पूर्व-पश्चिम वनविभागालादेखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Web Title:  Seven cases related inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.