सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:03 AM2017-12-30T00:03:06+5:302017-12-30T00:17:47+5:30

सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

Seimanti Kokate: Counseling seminars for teenage girls do not have the opportunity to get it | सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते

सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते

Next
ठळक मुद्देमुलींनीही राजकारणात सक्रिय व्हायला हवेप्रतिकार करायला शिकले पाहिजे

सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.
येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस.जी. पब्लिक स्कूलच्या माध्यमिक विभागात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. हिराताई गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या किशोरवयीन मुलींच्या सुमपदेशन चर्चासत्रास व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, अभिषेक गडाख, मुख्याध्यपक रघुनाथ एरंडे, अनिता थोरात, पोलीस दलातील दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, डॉ. मनीषा आहेर, शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे, बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या सविता देशमुख आदी उपस्थित होते. राजकारण केवळ पुुरुषांसाठीच नसून स्त्रियाही या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. गावच्या तालुक्याच्या कारभारात सहभागी होण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळते. शिवाय समाजसेवा करण्याचे समाधानही मिळते. मुलींनीही राजकारणात सक्रिय व्हायला हवे, असेही त्या म्हणाल्या. पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी दामिनी पथक मुलींसाठी व महिलांसाठी कसे कार्य करते याविषयी ध्वनी चित्रफीत दाखवून मार्गदर्शन केले. मुलींनी प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कुठलीही अडचण असल्यास १०९१ या सहायता व सुरक्षा क्र मांकावर फोन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीवनी गजभार, चंद्रकला साळुंखे, पुष्पा जाधव, प्रियांका देवकर, रोहिणी तुपे, शीतल उशीर, वैशाली कोळपे, सुवर्णा सातपुते, तबस्सुम शेख, रुपाली खैरनार, गीतांजली भवर, शुभांगी मोगल, सुवर्णा शिंदे, वैशाली राऊत, प्रियंका सहाणे, प्राजक्ता डुंबरे, रोहिणी वर्वे, रेश्मा कापडी आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Seimanti Kokate: Counseling seminars for teenage girls do not have the opportunity to get it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.