समीर भुजबळांच्या मातोश्रींचं नाव मतदार यादीतून गायब, भुजबळ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:05 PM2019-04-29T13:05:58+5:302019-04-29T13:09:19+5:30

नाशिक मतदारसंघात छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Sameer Bhujbal's name is missing from voters list, Bhujbal gets angry | समीर भुजबळांच्या मातोश्रींचं नाव मतदार यादीतून गायब, भुजबळ संतप्त

समीर भुजबळांच्या मातोश्रींचं नाव मतदार यादीतून गायब, भुजबळ संतप्त

नाशिक - नाशिक मतदारसंघात छगळ भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ या भुजबळ कुटुंबीयांनी सपत्नीक मतदान केलं आहे. मतदार केंद्रावर केल्यानंतर भुजबळांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असाही गंभीर आरोपही भुजबळांनी केलाय. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचं नाव गायब असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. 

Web Title: Sameer Bhujbal's name is missing from voters list, Bhujbal gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.