नगरसूल शाळेचे ६ महिन्यांपासून पगार थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:18 AM2017-08-22T01:18:20+5:302017-08-22T01:18:36+5:30

तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

 The salary of the municipal school was exhausted for 6 months | नगरसूल शाळेचे ६ महिन्यांपासून पगार थकले

नगरसूल शाळेचे ६ महिन्यांपासून पगार थकले

Next

येवला : तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. अखेर त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना निवेदन देऊन आपले गाºहाणे मांडले. याबाबत संबंधितांना कार्यवाही करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले. दरम्यान, आॅनलाइन पगाराचा मोठा डांगोरा होऊनदेखील नगरसूल विद्यालयातील पगारापासून वंचित असलेल्या ४५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांनी वेतनासाठी वेतन अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंबा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नगरसूल विद्यालयातील ४५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे माहे फेब्रुवारीपासूनचे पगार नाहीत. वेतनाबाबत धिम्या गतीने कार्यवाही होत आहे. वेतनाचा चेंडू वेतन पथका करून कोषागारात ढकलला जात आहे.त्यामुळे पगार पारित होत नाहीत. या कर्मचाºयांचे गृहकर्ज, वाहन कर्ज हप्ते थकल्याने बँकेच्या नोटिसा आल्या आहेत. विम्याचे हप्ते, थकल्याने पॉलिसी कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे शिक्षक अधिक चिंतातूर झाले आहेत. शिक्षकांच्या मुलामुलींचे,परगावी शिक्षण चालू आहे. त्यांना महिन्याचा खर्च पाठवणे अवघड झाले आहे. शिवाय कौटुंबिक खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कर्मचाºयांचे मानसिक संतुलन पूर्णत: कोलमडले. त्यामुळे कर्मचाºयांचे शारीरिक व मानिसक संतुलनाची हानी झाली आहे. या प्रश्नांकडे वेतन अधीक्षकांनी गांभीर्याने बघून प्रश्न मार्गी न लावल्याने अखेर आमदार डॉ. तांबे यांना निवेदन देण्यासह उपोषणाचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. नगरसूलच्या २२ सदस्यीय शिष्टमंडळाने डॉ. सुधीर तांबे, शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वेतन अधीक्षक उदय देवरे, गणेश फुलसुंदर यांचेशी चर्चा केली. दोन दिवसात प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत शिक्षकेतर संघटना जिल्हा अध्यक्ष रविंद्र जोशी,शिक्षक लोकशाही आघाडीचे नेते मोहन चकोर,मुख्याध्यापक संघाचे सचिव एस,बी.देशमुख,जिभाऊ शिंदे,माणीक मढवई, प्राचार्य सुभाष नागरे,शिक्षक नेते अनिल साळुंके ,राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदणे,शैला गवळी,मंगेश नागपुरे,सुधीर चेमटे, सुमेध कुर्हाडे, ,मंगेश नागपुरे, सुमित कुर्हाडे, संतोष दाभाडे, सुधीर चेमटे, नितीन मोकळ,भीमराज मुंगसे, देविदास देसले, दत्तात्रय बागडे,भगवान तेलोरे,यांनी सहभाग घेतला.६ मिहने पगार का होत नाही. अशी विचारणा डॉ.सुधीर तांबे यांनी संबंधितांना केली.येथील शिक्षकांचे डिसेंबर २०१६,जानेवारी २०१७ चे वेतन जिल्हाबँकेच्या गोंधळामुळे झालेच नाहीत. वेतन पथक आणि शासकीय कोषागार यांच्या चेडूफळीत फेब्रुवारीपासून आजतागायत पगार अडकले आहे.वेतनाविना त्रस्त झालेल्या शिक्षकांचे समाधान न झाल्याने अखेर पगार वेळेत न झाल्यास सहकुटुंब उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला.




 

Web Title:  The salary of the municipal school was exhausted for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.