देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:09 PM2018-09-18T17:09:24+5:302018-09-18T17:10:37+5:30

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.

The safety of the Deola city is on the wind | देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देखबरदारी आवश्यक : सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.
देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहराची वाटचाल स्वच्छ व सुंदर देवळा हि संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू आहे.चार वर्षांपूर्वी तत्कालीन देवळा ग्रामपंचायतीला तंटामुक्ती पुरस्काराचे मिळालेले ७ लाख रु पये शहरात सी.सी. टि. व्ही. यंत्रणा बसविण्यासाठी वापरण्यात आले. याचे नियंत्रण पोलिस ठाण्यात असल्यामुळे शहरात घडणाºया कोणत्याही घटनेची सुचना पोलिसांना त्वरीत मिळू लागल्यामुळे पोलिसांना त्वरीत निर्णय घेऊन कार्यवाही करता येऊ लागली. त्यामुळे सी.सी. टि. व्हि. यंत्रणेचा योग्य वापर करत गुन्हेगार, रोडरोमिओंना चांगलाच आळा घातला होता. कालांतराने हया यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर तिचा दुरु स्ती व देखभालीचा खर्च कोणी करावयाचा यावरून पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. हया वादातच हळूहळू शहरातील सर्व सी.सी. टि. व्हि. यंत्रणा कायमचीच बंद पडली. सदरचे सी.सी. टि. व्हि. केवळ शोभेचे बाहुलेच ठरले. कालांतराने सर्व साहीत्य गायब झाले. याची कोणतीही दखल पोलिस खात्याने किंवा नगर पंचायत प्रशासनाने घेतली नाही, यामुळे गाव तंटामुक्तीसाठी बक्षिसापोटी मिळालेले पैसे पाण्यात गेले. मात्र शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा दोन वर्षांपासून बंदअसल्याने धाडसी घरफोडयांबरोबरच लहानमोठ्या गुन्हेगारी घटना, तसेच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नियमितपणे घडत असल्यामुळे नागरीकांचे मोठे नुकसान होत आहे.

Web Title: The safety of the Deola city is on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.