रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार

By vijay.more | Published: September 11, 2018 12:49 AM2018-09-11T00:49:36+5:302018-09-11T00:50:14+5:30

शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़

 Road to death for pedestrians | रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार

रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार

Next

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ शहरातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रोड, कॉलनी रस्ते हे पादचाºयांसाठी धोकदायक ठरत असून, यामध्ये वृद्धांना रस्ता ओलांडणे कठीण होत चालले आहे़ त्यातच वाहनधारकांकडून वेगमर्यादेचे केले जात असलेले उल्लंघन अपघाताचे प्रमुख कारण आहे़  १ रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ त्यामध्ये हेल्मेटसक्ती व सीटबेल्ट सक्तीमुळे बहुतांशी दुचाकीस्वार तसेच कारचालक आता या नियमांचे पालन करताना दिसत आहेत़ मात्र, असे असूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसून गत सात महिन्यांच्या कालावधीत ११९ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला असून, ९ सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश आहे़ रस्ता ओलांडताना, रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी जाणाºया व्यक्तींना ठोस मारून वाहनचालक फरार झाले, त्यापैकी ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला़  २ जुलै महिन्यात सर्वाधिक सात पादचाºयांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून १६ जणांचा, तर सर्व्हिस रोडवरून चालणाºया पाच पादचाºयांचा तर शहरातील कॉलनीरोड, राज्य महामार्ग आणि इतर छोट्या रस्त्यांवरून चालणाºया १६ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. पादचारी मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक असून, अपघातानंतर वाहनचालक फरार होत असल्याने जखमींना वेळेत वैद्यकीय मदत प्राप्त होत नसल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे़

Web Title:  Road to death for pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.