रस्त्यावरील बॅरिकेडिंग, अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:38 AM2018-05-11T01:38:33+5:302018-05-11T01:38:33+5:30

नाशिक : पोलिसांनी चोपडा लॉन्सजवळील रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडिंगवर आदळून दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ ८) रात्रीच्या सुमारास घडली़

Road barricades, invitations to accidents | रस्त्यावरील बॅरिकेडिंग, अपघातांना निमंत्रण

रस्त्यावरील बॅरिकेडिंग, अपघातांना निमंत्रण

Next
ठळक मुद्देबॅरिकेड्स रस्त्यावरच ठेवत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण पोलीस यंत्रणेला याचा फायदा झाला

नाशिक : पोलिसांनी चोपडा लॉन्सजवळील रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडिंगवर आदळून दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ ८) रात्रीच्या सुमारास घडली़ शहरात केवळ चोपडा लॉन्सच नव्हे तर विविध ठिकाणच्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून पोलीस वाहन तपासणी करतात़ मात्र तपासणीनंतर हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करून हे बॅरिकेड्स रस्त्यावरच ठेवत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे़
सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या संख्येने शहरात बॅरिकेड्स पाठविले होते़ सिंहस्थानंतर यापैकी काही बॅरिकेड्स हे मागणीनुसार संपूर्ण राज्यात वितरित करण्यात आले, तर मोठ्या प्रमाणात शहरासाठी ठेवण्यात आले़ मात्र, कुंभमेळ्यानंतर यातील बहुतांशी बॅरिकेड्स शहर पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच पोलिसांचे वाहन तपासणी नाके या ठिकाणी ठेवले़ पोलीस यंत्रणेला याचा फायदा झाला असला तरी प्रतिदिन एकाच ठिकाणी वाहन तपासणी नाका असल्याने दररोज बॅरिकेड्स रस्त्यात लावणे काढणे यांचा पोलिसांना त्रास होऊ लागला, परिणामी दिवसेंदिवस हे बॅरिकेड्स एकाच जागेवर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहेत़
तातडीने व्हावी कारवाई
शहरातील चेक नाक्यावरील पोलीस बॅरिकेड्स लावण्याच्या दररोजच्या कटकटीपासून मुक्त होण्यासाठी बॅरिकेड्स रस्त्यावरच ठेवतात़ विशेष म्हणजे, रस्त्यावरील अस्ताव्यस्त बॅरिकेड्समुळे अपघात होऊ शकतो याची सुतरामही कल्पना पोलीस आयुक्त, शहर वाहतूक पोलीस तसेच त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना कशी येत नाही, असा सवाल केला जातो आहे़ बॅरिकेड्सला धडकून मृत्यू झालेले दुचाकीस्वार सुनील मटाले हे पोलिसांच्या हलगर्जीपणाचेच बळी ठरले आहेत़ किमान या घटनेनंतर तरी जागे होत अपघातास निमंत्रण ठरणारे रस्त्यावरील बॅरिकेड्स हटविणे गरजेचे आहे़

Web Title: Road barricades, invitations to accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस